FIFA World Cup Flashback : जगभरातील फुटबॉलप्रेमींनी वर्ल्डकपचा थरार गेल्या शुक्रवारी रात्री अनुभवला. स्पेन आणि पोर्तुगाल यांच्यात झालेली लढत ३-३ अशी बरोबरीत सुटली. पण असे असले तरी सामन्यात निर्णायक क्षणी पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने गोल केले आणि संघाला ३-३ अशी बरोबरी मिळवून दिली. त्या बरोबरच फुटबॉल कारकिर्दीतील त्याने ५१ वी हॅट्ट्रिक केली.

रोनाल्डो मैदानावर खेळताना कायम गोल करण्याच्या ध्येयाने भारावलेला असतो. तो प्रचंड परिश्रम घेतो आणि सामन्यात स्वत:चे अस्तित्व जाणवून देतो. पण २००६ साली विश्वचषक स्पर्धेत त्याच्यातील एका खट्याळ लहान मुलाचे दर्शन घडले.

२००६ साली विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोर्तुगाल आणि इंग्लंड यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात फुटबॉलवर ताबा मिळवण्यासाठी रूनी आणि पोर्तुगालच्या खेळाडूंमध्ये चुरस लागली होती. त्यावेळी रूनीचा धक्का लागून एका खेळाडूला दुखापत झाली. याबाबत पोर्तुगालने रेफरीकडे दाद मागितली. पण रेफरी कडक कारवाई करत नाही, हे पाहून रोनाल्डोने रूनीला चिडण्यासाठी उद्युक्त केले. आणि अपेक्षेप्रमाणे रूनीने रोनाल्डोला धक्का दिला. त्यानंतर मात्र, रूनीला रेफरीने रेड कार्ड दाखवले. त्यानंतर, रोनाल्डोने चक्क भर मैदानात त्या कृत्याबद्दल डोळा मारला.

हा पहा व्हिडीओ –

रूनीनेही त्यानंतर रोनाल्डोकडे रोखून पाहिले.