News Flash

Viral Video : ‘बाप से बेटा सवाई’; रोनाल्डोच्या मुलाची ‘सीझर किक’ तुम्ही पाहिलीत का?

'बाप से बेटा सवाई' ही म्हण रोनाल्डोच्या मुलाला अगदी चपखल बसते आहे.

ख्रिस्टीयनो रोनाल्डोचा मुलगा रोनाल्डो ज्युनियर

प्रत्येक मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी ही थोडीशी अधिक हुशार असते, असे म्हणतात. अनेक वेळा त्या गोष्टीचा प्रत्ययदेखील येतो. तर काही वेळा आईवडिलांचे नाव मोठे करण्याऐवजी काही लोक ते धुळीला मिळवतात. पण पोर्तुगालच्या फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो याचा मुलगा आपल्या वडिलांच्या पुढे एक पाऊल आहे. ‘बाप से बेटा सवाई’ ही म्हण रोनाल्डोच्या मुलाला अगदी चपखल बसते आहे.

रोनाल्डोचा मुलगा म्हणजेच रोनाल्डो ज्युनियर हा सध्या आपल्या वडिलांकडून फुटबॉलचे धडे घेत आहे. मैदानावर तो वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत विविध प्रकारच्या किक्स शिकत आहेच. मात्र याबरोबरच त्याने मैदानावरही आपली कमाल दाखवण्यास सुरुवात केली आहे. सध्या त्याच्या ‘सीझर किक’चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत पास केलेला बॉल रोनाल्डो ज्युनियर सीझर किक मारून गोलकीपरच्या डोक्यावरून गोल मारताना दिसत आहे.

तर, नुकताच पोर्तुगालच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आणखी एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडिओत रोनाल्डोने पास केलेल्या बॉलवर रोनाल्डो ज्युनियर गोल मारताना दिसतो आहे.

दरम्यान, या दोनही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून रोनाल्डो ज्युनियरमध्ये रोनाल्डोचीच झलक दिसते, अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 6:36 pm

Web Title: fifa world cup ronaldo son ronaldo jr scissor kick
टॅग : Football,Ronaldo
Next Stories
1 FIFA World Cup Flashback : अवघे ८ गोल; तरीही कोरले विश्वचषकावर नाव…
2 FIFA World Cup 2018 : …म्हणून स्पर्धेसाठी पात्र ठरूनही भारतीय संघ खेळला नाही १९५०चा वर्ल्डकप!
3 FIFA World Cup 2018 : ‘दी रेड डेव्हिल्स’ बेल्जियमची मदार रोमेलू लुकाकूवर
Just Now!
X