News Flash

FIFA World Cup : २०२६च्या विश्वचषकाची धूम अमेरिकेत…

२०२६च्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी मोरोक्को हा देशही जोर लावून होता. मात्र, अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या देशांना ही संधी मिळाली आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

FIFA World Cup 2018 : ही विश्वचषक स्पर्धा उद्यापासून सुरु होणार आहे. यादरम्यान, २०२६च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद हे अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांना देण्यात आल्याचे आज ‘फिफा’ने जाहीर केले. २०२६च्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी मोरोक्को हा देशही आपला जोर लावून होता. मात्र, अखेर या स्पर्धेसाठी अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या देशांना ही संधी मिळाली आहे.

आज झालेल्या मतदानात मोरोक्कोला केवळ ६५ मते मिळाली, तर अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांना एकत्रितपणे १३४ मते मिळाली. त्या आधारावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने म्हणजेच फिफाने या तीन देशांकडे २०२६च्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद सुपूर्द करण्याचा निर्णय दिला.

प्रथमच या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद तीन देश एकत्रित येऊन भूषवणार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिन्ही देशांना या यजमानपदाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.

२०२६चा वर्ल्डकप आतापर्यंतचा सर्वात मोठा वर्ल्डकप ठरणार आहे. या वर्ल्डकपमध्ये ४८ देश सहभागी होणार असून ३४ दिवस चालणाऱ्या या वर्ल्डकपमध्ये ८० सामने होणार आहेत. यातील ६० सामने अमेरिकेत तर प्रत्येकी १०-१० सामने मेक्सिको आणि कॅनडात होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2018 7:00 pm

Web Title: fifa world cup us canada and mexico canada to host world cup 2026
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : स्पर्धेच्या तोंडावर स्पेनच्या फुटबॉल प्रशिक्षकाची हकालपट्टी
2 FIFA World Cup 2018: ‘त्या’ वक्तव्याबद्दल पंतप्रधानांनी जाहीर माफी मागावी, गोलकिपरची मागणी
3 FIFA World Cup 2018 : भारताचा संघ नाही; पण ‘या’ दोन चिमुकल्यांना मिळणार मैदानात एन्ट्री…
Just Now!
X