28 September 2020

News Flash

FIFA World Cup 2018: फ्रान्स अंतिम सामन्यांत पोहोचल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

संपूर्ण स्पर्धेसह उपांत्य फेरीतील या सामन्यांत फ्रान्सपेक्षा सरस कामगिरी असणाऱ्या बेल्जिअमच्या संघाला पराभूत व्हावे लागल्याने ट्विटरवर क्रिडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त करीत अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

फुटबॉलचा विश्वचषक जिंकल्यानंतर वीस वर्षांनंतर फ्रान्सने पुन्हा एकदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे. मात्र, संपूर्ण स्पर्धेसह उपांत्य फेरीतील या सामन्यांत फ्रान्सपेक्षा सरस कामगिरी असणाऱ्या बेल्जिअमच्या संघाला पराभूत व्हावे लागल्याने ट्विटरवर क्रिडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त करीत अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

फ्रान्सच्या संघाचा या खेळात केवळ टिकून रहायचे आणि त्यासाठी बचावात्मक खेळ करायचा एव्हढाच प्लान होता. बेल्जिअमच्या संघावर दबाव टाकण्याचा त्यांच्याकडे कुठलाही प्लान नव्हता. मात्र, फ्रान्सच्या संघाला मात देण्यासाठी चांगल्या प्लानसह बरीच मेहनत बेल्जिअमच्या संघाने घेतली होती.

फ्रान्सचा खेळाडू केलिअन म्बापे याने बॉलवर पकड मिळवण्यासाठी चांगलीच धावपळ केली. त्याला इडन हझार्ड, डे ब्रुने आणि फेलानी या बेल्जिअमच्या खेळाडूंनी फ्रेन्च खेळाडूंना रोखण्याचा चांगला प्रयत्न केला. यावेळी ह्युगो लोरीस याने गोल वाचवण्यासाठी बरीच मेहनत घेतली. दरम्यान, एकूणच अपेक्षेपेक्षा वेगळा खेळ झाल्याने ट्विटवर प्रतिक्रियांचा चांगलाच पाऊस पडला.

Next Stories
1 FIFA World Cup 2018 : वीस वर्षांत सर्वाधिक वेळा फायनलमध्ये पोहोचणारा फ्रान्स ठरला पहिलाच देश
2 FIFA World Cup 2018 : लॅटिन अमेरिकेचे आशास्थान उरुग्वे!
3 FIFA World Cup 2018 : कामगिरीत क्रोएशिया वरचढ आणि पूर्वेतिहास इंग्लंडसाठी अनुकूल
Just Now!
X