रशियात सुरु असलेल्या फिफा विश्वचषकाचे साखळी सामने अखेर संपुष्टात आलेले आहे. सर्वोत्तम १६ संघांनी बाद फेरीत समावेश केला आहे. हा विश्वचषक अनेक गोष्टींसाठी क्रीडा रसिकांच्या लक्षात राहणार आहे. महत्वाच्या निर्णयासाठी व्हिडीओ रेफ्रींचा घेतलेला आधार, पेनल्टी कॉर्नर- रेड कार्ड या बाबतींमध्ये हा विश्वचषक लोकांच्या नक्कीच लक्षात राहणार आहे. विश्वचषकात आतापर्यंत काही विक्रमांची नोंद करण्यात आलेली आहे. आज ते विक्रम आपण जाणून घेणार आहोत.

  • यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत ९ ओन गोलची नोंद करण्यात आलेली आहे. विश्वचषकाच्या इतिहासातली ही सर्वाधीक ओन गोलची संख्या आहे.
  • आतापर्यंत विश्वचषकात २४ पेनल्टी किक बहाल करण्यात आल्या आहेत.
  • २४ पेनल्टी किकपैकी १८ किकचं गोलमध्ये रुपांतर झालेलं आहे.
  • साखळी फेरीत आतापर्यंत १२२ गोलची नोंद करण्यात आलेली आहे.
  • शेवटचं मिनीट किंवा अतिरीक्त वेळेत गोल करुन आतापर्यंत ८ सामने जिंकले आहेत.
  • इजिप्त आणि पनामाला साखळी फेरीत एकही गुण कमावता आला नाही.
  • सर्वात कमी म्हणजेच ४ गुणांची कमाई करुन दोन संघ बाद फेरीत दाखल झाले आहेत (जपान आणि अर्जेंटीना)
  • खिलाडूवृत्तीच्या (फेअर प्ले) निकषाच्या आधारावर बाद फेरीत दाखल झालेला जपान हा पहिला देश ठरला आहे.
  • गुण तालिकेत उणे फरकाने बाद फेरीत दाखल झालेले संघ अर्जेंटीना (-२) आणि मेस्किको (-१)
  • बाद फेरीत दाखल होणारा जपान हा एकमेव आशियाई देश ठरला.
  • साखळी फेरीत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूाचा मान इंग्लंडच्या हेरी केनकडे (५ गोल)
  • साखळी फेरीत सर्व सामने जिंकलेले संघ – बेल्जियम, क्रोएशिया, उरुग्वे
  • सर्वात जास्त बरोबरीत सामने सोडवणारे संघ – डेन्मार्क, पोर्तुगाल आणि स्पेन (२ सामने)
  • एकही गोल न स्विकारलेला गोलकिपर – फर्नांडो मुसलेरा (उरुग्वे)
  • सर्वाधिक कमी उपस्थिती असलेला सामना – इजिप्त विरुद्ध उरुग्वे (२७,०१५)
  • साखळी फेरीतून बाहेर पडलेला एकमेव दक्षिण अमेरिकन देश – पेरु
  • विश्वचषकाच्या साखळी फेरीतून जर्मनीचा संघ पहिल्यांदाच बाहेर.
  • १९८२ सालापर्यंत पहिल्यांदाच बाद फेरीत एकही आफ्रिकन देश पात्र ठरला नाही.