सालेम अल दवसारीच्या गोलच्या जोरावर सौदी अरेबियानं इजिप्तवर २-१ असा रोमहर्षक विजय मिळवला. सौदी अरेबियाचा फिफा विश्वचषकात गेल्या २४ वर्षातला हा पहिलाच विजय ठरला. १९९४ सालापासून सौदी अरेबियानं विश्वचषकात १२ सामने खेळले होते, त्यापैकी १० सामन्यांत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, तर २ सामने बरोबरीत सुटले. दरम्यान वोल्गोग्रॅड अरेनात झालेल्या या सामन्यात मोहम्मद सलाहनं २२ व्या मिनिटाला गोल करुन इजिप्तचं खातं उघडलं होतं. या सामन्यात ४१ व्या मिनिटाला सौदी अरेबियाच्या फहाल अल मुवालदची पेनल्टी किक इजिप्तचा गोलकिपर इसाम इल हदरीनं थोपवून लावली.इजिप्तचा गोलकीपर इसाम इल हदरी हा फिफा विश्वचषकात खेळणारा आजवरचा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. याआधी हा विक्रम कोलंबियाचा गोलकीपर मॉन्डरॅगोनच्या नावावर होता. तसेच १९६६ नंतर फिफा विश्वचषकाच्या पदार्पणातचं पेनल्टी थोपवून लावणारा इसाम इल हदरी हा आजवरचा चौथा गोलकीपर ठरला.
सौदी अरेबियाचा इजिप्तवर 2-1 असा रोमहर्षक विजय, सौदी अरेबियाचा फिफा विश्वचषकात 1994 सालानंतर पहिला विजय, गेल्या 24 वर्षांत सौदी अरेबियानं विश्वचषकात खेळले 12 सामने, त्यात 10 सामन्यांत पराभव, तर 2 सामने बरोबरीत सुटले. @LoksattaLive@kridajagat@MarathiBrain#KSA#WorldCup#KSAEGY
मात्र पाचच मिनिटांनी सलमान अल फराजनं पेनल्टी किकवरच गोल डागून सौदी अरेबियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. यानंतर काहीवेळासाठी हा सामना १-१ असा बरोबरीत सुटेल असं वाटत होतं, मात्र सालेम अल दवसारीनं ९५ व्या मिनिटाला गोल झळकावून सौदी अरेबियाच्या २-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केलं. दरम्यान मोहम्मद सलाहच्या इजिप्तला यंदाच्या विश्वचषकातून रिकाम्या हाताने घरी परतावं लागलं.