रशियात सुरु असलेल्या फिफा विश्वचषकात लायनोल मेसी आणि अर्जेंटीनाचा संघ फारशी चमकदार कामगिरी करु शकला नाही. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्जेंटीनाची कामगिरी सुमार राहिली. त्यातच पहिल्या सामन्यात मेसीने पेनल्टी कॉर्नवर संधी गमावल्यामुळे त्याच्यावर चारही बाजूंनी टिकेची झोड उठली होती. मात्र आज मेसी आपला ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या लाडक्या खेळाडूला त्याच्या वाढदिवसाचं संस्मरणीय गिफ्ट देण्याच्या प्रयत्नातून मॉस्कोतील काही चाहत्यांनी पुतळ्याच्या स्वरुपातला चॉकलेट केक बनवला आहे.

मॉस्कोमधील एका मिठाईच्या दुकानातील ५ कर्मचाऱ्यांनी मेसीचा हा खास केक बनवला आहे. या केकचं वजन हे ६० किलो असून हा केक तयार करण्यासाठी तब्बल आठवडाभराचा कालावधी लागला आहे. “२४ जूनला मेसीचा वाढदिवस असल्याचं आम्हाला माहिती होती. काहीतरी वेगळं गिफ्ट देण्यासाठी आम्ही विचार करत होतो”, यामधून आम्हाला या चॉकलेट केकची कल्पना सुचल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. हा केक आपण मेसीला देणार असल्याचंही या दुकानातील एका कर्मचाऱ्याने सांगितलं आहे.

अखेरचा हात फिरवून झाल्यानंतर असो दिसतोय मेसीचा बर्थडे केक