News Flash

स्पार्कलिंग वाइन

वाइनमधले बुडबुडे हे जेव्हा वाइनमध्येच तयार होतात तेव्हा ती क्वॉलिटी अधिक चांगली समजली जाते.

फाइन डाइनमध्ये वाइनला विशेष महत्त्व आहे. रेड वाइन, रोझे वाइन आणि व्हाइट वाइन या प्रकारांनंतर आता स्पार्कलिंग वाइन कशाला म्हणायचं हे पाहू या.

ज्या वाइनमध्ये बुडबुडे असतात ती स्पार्कलिंग वाइन! रेड, व्हाइट आणि रोझे, या तिन्ही वाइन्समध्ये स्पार्कलिंगची व्हरायटी असू शकते. पण आज सर्वात जास्त प्रमाणात बनवली जाणारी स्पार्कलिंग वाइन ही व्हाइटमध्ये आहे. स्पार्कलिंगमधली सर्वात प्रसिद्ध वाइन आहे ‘शॅम्पेन’ (champagne)! तिला बबली (bubbly) असंही संबोधलं जातं. जिओग्राफिकल इंडिकेशन अर्थात GI  चे कडक नियम शॅम्पेन च्या बाबतीतही लागू आहेत. (GI म्हणजे भौगोलिक स्वामित्व हक्क. कोणत्याही पदार्थाचे किंवा वस्तूचे उत्पादन/पीक ज्या ठिकाणी होते ते ठिकाण) शॅम्पेन इलाक्यात येणाऱ्या गावांमध्ये, ठरलेल्या द्राक्षांच्या व्हरायटी वापरून आणि ठरलेल्या पद्धतीनेच बनवलेल्या वाइनला शॅम्पेन म्हणता येतं. फ्रान्समध्ये इतर कोणत्याही जागी तीच द्राक्षांची व्हरायटी वापरून, ठरलेल्या पद्धतीने जरी तशीच स्पार्कलिंग वाइन बनवली, तरी तिला शॅम्पेन म्हणता येणार नाही.

स्पार्कलिंग वाइन अनेक पद्धतींनी करता येते. सर्वात सोपी पद्धत म्हणजे स्टील वाइनमध्ये (ज्यात बुडबुडे नसतात ती) कार्बन डायऑक्साईड गॅस घालून मग बाटलीत भरणे. ही वाइन अर्थातच जरा स्वस्त असते आणि ‘फ्लॅट’पण लवकर होते. अशा वाइनला एरेटेड वाइनही म्हणतात. वाइनमधले बुडबुडे हे जेव्हा वाइनमध्येच तयार होतात तेव्हा ती क्वॉलिटी अधिक चांगली समजली जाते. एका मोठय़ा टँकमध्ये, अधिक यीस्ट घालून दुसऱ्यांदा फर्मेन्टेशन करून ती वाइन बाटलीत घातली जाते. सर्वात उत्तम प्रतीची स्पार्कलिंग वाइन ती, जिचं दुसरं फर्मेन्टेशन बाटलीतच होतं! अशी वाइन बनवायला खूप वेळ तर लागतोच, पण कसबही लागतं. म्हणून अशी वाइन इतर बुडबुडेवाल्या वाइन्सपेक्षा महाग नसली तर नवलच! या वाइन्समध्ये फ्रान्सच्या ‘शॅम्पेन’ची जागा अग्रगण्य आहे. इतर देशांमधल्या, या पंक्तीत बसणाऱ्या स्पार्कलिंग वाइन्स आहेत – इटलीची ‘अस्ती स्पुमांते’ (Asti Spumante), स्पेनची ‘कावा’ (Cava), जर्मनीची ‘सेक्त’ (Sekt) आणि इतर काही.

स्पार्कलिंग वाइन प्यायचे ग्लासही नेहमीच्या वाइन ग्लासपेक्षा वेगळे असतात. वाइन लवकर फ्लॅट होऊ  नये, त्यातली स्पार्कल जास्त वेळ टिकून राहावी, याकरिता ग्लासचं तोंड अरुंद असावं लागतं. ‘फ्ल्यूट’ आणि ‘टय़ुलिप’ हे दोन ग्लास त्या कारणासाठी वापरले जातात. पण हे ग्लास भरलेल्या बँक्वेट रूममधून ट्रेवरून घेऊन जायला थोडे कठीण असतात. चुकून कोणाचा धक्का लागलं तर पटकन कलंडण्याची भीती असते. अशा वेळी ‘सॉसर’ ग्लास वापरला जातो. मोठय़ा समारंभांना अनेकदा या ग्लासचा पिरॅमिड बनवून, सर्वात वरच्या ग्लासमधून अविरत वाइन सोडली जाते, अगदी शेवटी खालच्या थरातला ग्लास भरेपर्यंत!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2016 12:11 am

Web Title: sparkling wine
Next Stories
1  व्हाइट वाइन
2  वाइन स्टोरेज
3 फाइन डाइन : वाइन टेस्टिंग
Just Now!
X