चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटिकेट शिकवणारे सदर. औपचारिक पाश्चिमात्य जेवणात टेबल मॅनर्समध्ये नॅपकिन कसा ठेवावा आणि आणि पहिला कोर्स अर्थात सूप कसं खावं यासंदर्भात काय रीत आहे?
यजमानांनी इशारा केल्यानंतर भोजनाची सुरुवात होते. हा इशारा म्हणजे नॅपकिनची घडी उघडून मांडीवर ठेवली जाते आणि पहिला कोर्स खायला कटलरी उचलली जाते.

नॅपकिन
नॅपकिनचा वापर का व कसा करतात हे मागच्या आठवडय़ातील फाइन डाइन सदरात सांगितले आहे. यजमानांच्या इशाऱ्यावर इतरांनीही आपापला नॅपकिन उघडून मांडीवर ठेवावा. खूप मोठा असल्यास त्याची अर्धी घडी घालून मांडीवर ठेवता येतो. फाइन डाइनमध्ये सव्‍‌र्ह केलेले सगळेच पदार्थ खायला सोपे असल्याने ते खाताना काही अंगावर सांडायचा चान्स कमीच. त्यामुळे लहान बाळांच्या गळ्याभोवती ‘बिब’ लावतात तसा स्वत:च्या गळ्याभोवती नॅपकिन लावू नये. खाताना बोटांना काही अन्न लागल्यास अथवा ओठांच्या बाहेर सॉस लागल्यास, ते पुसण्यासाठी नॅपकिन उपयोगी पडतो. खोकताना किंवा शिंकताना नॅपकिनचा उपयोग करू नये. जेवणाच्या मध्ये काही कारणासाठी थोडा वेळ टेबल सोडून जायची वेळ आली, तर आपला नॅपकिन खुर्चीच्या सीटवर ठेवावा. असे केल्याने इतरांना कळते की, तुम्ही परत येणार आहात. जेवणाच्या समाप्तीस टेबल सोडून जाताना नॅपकिनची हलकी घडी करून टेबलावर ठेवून द्यावी.

student copying Nashik division
नाशिक : पहिल्या दिवशी नक्कल करणारे दोन जण ताब्यात, विभागात दहावी परीक्षेला सुरुवात
wife does not wear saree of my choice husband created ruckus matter reached police station couple goes for divorce
पत्नी आवडीची साडी नेसत नाही; कंटाळलेल्या पतीने लग्नानंतर ८ महिन्यातच मागितला घटस्फोट
Nashik Citylink bus
परीक्षा काळातच नाशिकची सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प
dombivli marathi news, youth cheated of rupees 33 lakhs dombivli marathi news, online transactions fraud marathi news
डोंबिवलीत तरूणाची ऑनलाईन व्यवहारातून ३३ लाखांची फसवणूक

सूप
सूपच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असते ती म्हणजे त्याची गणना पेयामध्ये होत नाही. सूप कितीही पातळ, पाणीदार असलं तरी त्याची गणना अन्नामध्ये होते, पेयात नाही. तेव्हा ‘वी ईट सूप, नॉट ड्रिंक इट’. कॉन्टिनेन्टल जेवण पद्धतीत सूपचे अनेक प्रकार असतात. काही जाडसर असतात (उदाहरणार्थ, क्रीम सूप) आणि काही अगदी पाण्यासारखी पातळ (उदाहरणार्थ, कॉन्सॉमे). सूप कशात सव्‍‌र्ह करायचं हे त्याच्या प्रकारावर अवलंबून असत. जाडसर सूप्स सूप प्लेट (खोलगट बशी) मध्ये सव्‍‌र्ह करतात आणि कॉन्सॉमे हे कॉन्सॉमे कपमध्ये सव्‍‌र्ह होते. कॉन्सॉमे कप हे एक प्रकारचे सूप बोलच असते, ज्याला दोन कान असतात. सूपबरोबर ब्रेडरोल्सपण देतात.

सूप खाताना कोणते शिष्टाचार पाळायचे ?

* सूप कितीही गरम असले तरी त्यावर फुंकर मारू नये. थंड करण्यासाठी अलगद ढवळावे.
* ब्रेडरोल्स किंवा ब्रेडस्टिक्सचे तुकडे करून सूपमध्ये घालू नयेत.
* खाताना फुर्र फुर्र आवाज करू नये.
* खाताना चमचा स्वत:कडे आणावा. आपण सूप बोल/ प्लेटवर पूर्णपणे वाकू नये.
* चमच्यातून थेंब सांडण्याचा संभव असेल तर चमच्याची खालची बाजू बोलच्या काठाला पुसून घ्यावी.
* सूप ओठांच्या खाली ओघळल्यास नॅपकिनने अलगद पुसावे.
* सूप संपत आल्यावर, चमचा सुपाने भरायला सूप बोल स्वत:पासून, अगदी अलगदपणे थोडं दूर कलंडून सूप चमच्यात घ्यावे. (Tilt the bowl away from you).
* संपल्यानंतर सूप प्लेट असल्यास चमचा त्यातच ठेवावा आणि सूप बोल असेल तर त्याच्याखाली असलेल्या बशीत ठेवावा.