फाइन डाइनमध्ये वाइनला विशेष महत्त्व आहे. रेड वाइन आणि रोझे वाइन याविषयी गेल्या भागात वाचल्यानंतर आता व्हाइट वाइनच्या अंतरंगाविषयी..

मागच्या लेखात आपण रेड वाइनबद्दल वाचलं. रेड वाइन ही काळ्या द्राक्षांपासून बनवली जाते. तर मग व्हाइट वाइन ही साहजिकच सफेद द्राक्षांपासून बनवली जात असणार, बरोबर? पण गम्मत ही आहे की, व्हाइट वाइन ही काळ्या द्राक्षांपासूनसुद्धा बनवली जाते! अशा वाइनला ‘व्हाइट ऑफ द ब्लॅक’ असं म्हणतात. काळ्या द्राक्षांचा रस काढल्याबरोबर, त्यात सालं बुडू न देता वाइन बनवायला घेतली जाते. त्यामुळे सालांमधलं रंगद्रव्य रसात उतरत नाही आणि त्यातून होणारी वाइन व्हाइट असते.

व्हाइट वाइनची नावंदेखील त्यांच्या द्राक्षांपासून येतात. काही पॉप्युलर व्हाइट वाइन्स आहेत- शार्दोने (Chardonnay), रीिझ्लग (Riesling), शेनीन ब्लाँ (Chenin Blanc) इत्यादी. काही वाइन्सचं त्यांच्या गावांवरून किंवा परिसरावरून बारसं केलं आहे- सॉतर्न (Sauterne), शाब्ली (Chablis), आदी. रेड वाइन रूम टेम्परेचरला सव्‍‌र्ह केली जाते. रूम टेम्परेचर युरोपियन संदर्भानुसार हे महत्त्वाचं. पण व्हाइट वाइन अगदी चील्ड सव्‍‌र्ह केली जाते. ५ अंश से. ते ७ अंश सेल्सिअस तापमान आयडिल समजलं जातं. ती ग्लासमध्ये ओतल्यानंतरही काही काळ तेवढीच थंड राहावी या उद्देशाने काही जण वाइन ओतायच्या आधी ग्लासही थंड करून घेतात. पिण्याच्या दोन राउंड्समध्ये वाइनची बाटली ‘वाइन चिलर’ किंवा ‘वाइन बकेट’मध्ये थंड ठेवली जाते. ही बकेट एका टेबलजवळ एका स्टँडवर ठेवता येते.

ही वाइन चिल्ड सव्‍‌र्ह होत असल्याने ‘स्वर्ल’ करीत नाहीत. रेड वाइन ग्लासच्या मानाने व्हाइट वाइनचा ग्लास थोडा छोटा असतो. भरलेला असताना हा ग्लास नेहमी दांडय़ाने धरावा, म्हणजे तळहाताच्या उबेने वाइनचं टेम्परेचर वाढत नाही. सव्‍‌र्ह करतानापण बाटलीभोवती वेटर्स क्लॉथ गुंडाळून ती सव्‍‌र्ह केली जाते. वाइन ग्लासमध्ये अध्र्याहून अधिक ओतली जाते.

व्हाइट वाइनचा रंग अगदी हलका सोनेरीपासून गडद सोनेरी असू शकतो. ती जशी एज होते, तसा तिचा रंग गडद होत जातो. काही वाइन्समध्ये हलकी हिरवट छटाही असू शकते.