शस्त्रांची चर्चा करताना बहुतांशी दारूगोळ्याला गृहीत धरले जाते. वास्तविक दारूगोळ्याशिवाय शस्त्रे म्हणजे धातूचे केवळ सांगाडे आहेत. स्फोटके हा दारूगोळ्याचा महत्त्वाचा घटक. ज्या पदार्थाचा स्फोट घडवल्यानंतर अत्यंत कमी वेळात वायू व उष्णता तयार होऊन आसपासच्या हवेत प्रसरण पावतात आणि जोराने ध्वनीलहरी उत्पन्न करतात ज्यायोगे मोठे नुकसान होऊ शकते, त्याला स्फोटक म्हटले जाते. ती प्रामुख्याने भौतिक किंवा यांत्रिक (मेकॅनिकल), रासायनिक आणि आण्विक या प्रकारची असतात. तसेच स्फोटाच्या पद्धतीनुसार त्यांचे लो एक्स्प्लोझिव्ह आणि हाय एक्स्प्लोझिव्ह असे प्रकार पडतात. लो एक्स्प्लोझिव्ह पेटवल्यानंतर भुरभुरत जळून जातात. म्हणजेच त्यांचे डिफ्लॅग्रेशन होते. ती बंदिस्त जागेत पेटवली तरच स्फोट होतो. हाय एक्स्प्लोझिव्हचा पेटवल्यावर लगेच मोठा स्फोट होतो. त्याला एक्स्प्लोजन म्हणतात.

गनपावडर हे मानवाला गवसलेले पहिले स्फोटक मानता येईल. ते लो एक्स्प्लोझिव्ह आहे. त्यानंतर १८४६ साली इटलीचे रसायनशास्त्रज्ञ अस्कानिओ सॉब्रेरो यांनी नायट्रोग्लिसरीन या स्फोटकाचा शोध लावला. मात्र त्याच्या स्फोटाची खात्रीशीर पद्धत उपलब्ध नव्हती.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

स्वीडनमधील आल्फ्रेड नोबेल यांनी १८६५ साली स्फोटकांचा सुरक्षितपणे स्फोट घडवण्यासाठी ब्लास्टिंग कॅप किंवा डिटोनेटरचा शोध लावला. स्फोटकांच्या विश्वात हा गनपावडरच्या शोधानंतरचा सर्वात मोठा शोध मानला जातो. त्यानंतर १८६७ साली नोबेल यानी डायनामाइटच्या रूपात दुसरा महत्त्वाचा शोध लावला. त्याचे त्यांनी १८६९ साली पेटंट घेतले. डायनामाइटचा खाण आणि शस्त्रास्त्र उद्योगांत मोठय़ा प्रमाणावर वापर झाला. त्यातून नोबेल यांनी भरपूर पैसा कमावला. आयुष्याच्या अखेरीस एक न्यास स्थापन करून त्याला ही संपत्ती दान दिली. आजवर त्याच्या व्याजातून नोबेल पारितोषिके दिली जात आहेत.

आधुनिक काळात अमोनियम नायर्ट्ेटसारखी अनेक प्रकारची स्फोटके अस्तित्वात आली. पण लष्करी वापराच्या स्फोटकांमध्ये प्रामुख्याने ट्रायनायट्रोटोल्यून (टीएनटी), पिक्रिक अ‍ॅसिड किंवा अमोनियम पिक्रेट (एक्स्प्लोझिव्ह डी), आरडीएक्स, पेंटाइरिथ्रिटॉल टेट्रानायट्रेट (पीईटीएन किंवा नायट्रोपेंटा), ईथिलीनडायअमाइनडायनायट्रेट (ईडीएनए), प्लास्टिक एक्स्प्लोझिव्ह, इंप्रुवाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) आदी स्फोटकांचा समावेश होतो.

टीएनटी हा पिवळसर रंगाचा स्फटिकासारखी रचना असलेला पदार्थ आहे. त्याचा लष्करी वापर होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचा विलयबिंदू ८०.८ अंश सेल्सिअस असल्याने ते सहजवणे वितळवून बॉम्ब, तोफगोळे आदींमध्ये भरता येते. तसेच ते हाताळण्यास तुलनेने सुरक्षित आहे. टीएनटीची अन्य स्फोटकांबरोबर मिश्रणेही तयार करता येतात. उदा. टीएनटी आणि अमोनियम नायट्रेट एकत्र करून अमॅटॉल हे स्फोटक बनते. पिक्रिक अ‍ॅसिड पहिल्या महायुद्धापासून वापरात होते. आता त्याऐवजी पीईटीएनसारखी स्फोटके वापरात आली आहेत. पीईटीएन खूपच संवेदनशील असल्याने त्यात मेणासारखे अन्य पदार्थ मिसळून वापरले जाते.

आरडीएक्स (रिसर्च डिपार्टमेंट एक्स्प्लोझिव्ह)  हे स्फोटक सायक्लोनाइट, हेक्झोजेन किंवा टी-४ या नावांनीही ओळखले जाते. त्याचा ८७०० मीटर प्रति सेकंद वेगाने स्फोट होतो. त्याचा विलयबिंदू २०४ अंश सेल्सिअस आणि स्फोटाचा बिंदू २४० अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे ते वितळवून वापरण्यास फारसे सुरक्षित नाही. ते टीएनटी किंवा अन्य पदार्थाबरोबर मिसळून घनरूपात वापरले जाते. ऑक्टोजेन हे हेक्झोजेनपेक्षा शक्तिशाली स्फोटक आहे.

sachin.diwan@expressindia.com