वाफेच्या शक्तीचा विविध कामांसाठी वापर करण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून होत होते. इंग्लिश संशोधक थॉमस न्यूकोमेन यांनी १७१२ साली तयार केलेल्या वाफेच्या इंजिनात स्कॉटलंडचे संशोधक जेम्स व्ॉट यांनी सुधारणा करून १७८१ साली वाफेचे इंजिन विकसित केले. त्याने औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली. लवकरच अनेक प्रकारची यंत्रे, वाहने, जहाजे वाफेच्या शक्तीवर चालू लागली. या वेळपर्यंत जहाजे वल्ही आणि वाऱ्याच्या जोरावर चालत असत. त्यामुळे त्यांच्या वापरावर मर्यादा होत्या. वाफेच्या शक्तीने जहाजांचे वाऱ्यावरील अवलंबित्व संपवले. तसेच जहाजांची ताकद वाढवली.

वाफेच्या शक्तीवर चालणारे पहिले जहाज फ्रान्सचे संशोधक डेनिस पापिन यांनी १७०४ साली बनवले.  तर वाफेच्या शक्तीवर चालणारी पहिली युद्धनौका अमेरिकेतील रॉबर्ट फुल्टन यांनी १८१३ साली बांधली. तिच्या डिझायनरने तिचे नाव डेमोलोगस म्हणजे लोकांचा शब्द (वर्ड ऑफ द पीपल) असे ठेवले होते. पण अमेरिकेने तिचे अधिकृत नाव यूएस स्टीम बॅटरी फुल्टन असे ठेवले. ब्रिटनच्या रॉयल नेव्हीने १८२२ साली एचएमएस कॉमेट ही फ्रिगेट चालवण्यासाठी प्रथम वाफेच्या शक्तीचा वापर केला. फ्रान्सने १८५० साली बनवलेली ल नेपोलियन नावाची युद्धनौका पहिली हेतुपुरस्सर बांधलेली वाफेच्या शक्तीवर चालणारी युद्धनौका होती. या युद्धनौकेवर प्रथमच स्क्रू प्रोपेलर वापरला गेला होता. त्यापाठोपाठ १८५३ साली तशाच प्रकारची ब्रिटनची एचएमएस अगामेम्नॉन ही युद्धनौका दाखल झाली. अमेरिकेच्या वाफेच्या शक्तीवर चालणाऱ्या पहिल्या युद्धनौका मिसिसिपी आणि मिसुरी या १८५५ साली तयार झाल्या. त्यांना बाजूला चाकासारख्या वल्ह्य़ांची सोय होती.

Russia-Ukraine war tanks become obsolete in modern warfare
Russia-Ukraine War: आधुनिक युद्धात रणगाडे निकाली निघालेत का?
Elon musk on israel iran war
इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाले, “रॉकेट एकमेकांच्या…”
What is Israel Iron Dome a defense system that prevents Iranian attacks
इराणी हल्ल्यांना रोखून धरले इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने… काय आहे ही बचाव यंत्रणा?
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!

फुल्टन ही कॅटामरान प्रकारची नौका होती आणि तिच्या मध्यभागी पॅडल-व्हील होते. ही युद्धनौका म्हणजे तरंगता किल्लाच होती आणि प्रामुख्याने किनारी भागातील कारवायांसाठी बनवली होती. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये १८१२ सालचे युद्ध सुरू असताना तिची बांधणी सुरू झाली आणि फुल्टन यांच्या मृत्यूनंतर १८१५ साली ती पूर्ण होऊन १८१६ साली अमेरिकी नौदलात दाखल झाली. ब्रिटनने अगामेम्नॉन प्रकारच्या अनक युद्धनौका १९व्या शतकाच्या पूर्वार्धात बनवल्या. सुरुवातीला त्या साइड-व्हिल पेडल प्रकारच्या होत्या. १८३० नंतर त्यात स्क्रू-प्रोपेलर वापरण्यात येऊ लागले. या देन्ही प्रकारच्या युद्धनौकांचा ब्रिटनने १८५४ ते १८५६ या काळातील क्रिमियन युद्धात मोठय़ा प्रमाणावर वापर केला. फ्रान्सच्या नेपोलियन युद्धनौकेवर ९० तोफा होत्या आणि दहा वर्षांत फ्रान्सने अशा ९ युद्धनौका बांधल्या. त्यामध्ये वाफेची शक्ती आणि शिडे अशी दोन्ही सोय होती. सामान्यपणे त्या शिडांद्वारे चालवल्या जात. पण युद्धकाळात वाऱ्यावर अवलंबून न राहता वाफेच्या शक्तीवर चालवल्या जात.

वाफेच्या शक्तीवरील पहिली जहाजे पॅडल-स्टीमर प्रकारची होती आणि त्यांना गती देण्यासाठी साइड-लीव्हर प्रकारची इंजिने वापरात होती. तर स्क्रू-प्रोपेलर जहाजांमध्ये व्हर्टिकल-बिम इंजिने वापरली जात. १८८१ साली ट्रिपल एक्स्पान्शन स्टीम इंजिन वापरात आले. ते पूर्वीच्या दोन्ही प्रकारांपेक्षा अधिक प्रभावी होते. बोहेमियन तंत्रज्ञ जोसेफ रेसेल याने १८२७ साली स्क्रू-प्रोपेलरचे पेटंट घेतले. वाफेच्या शक्तीवर चालणारी इंजिने आणि स्क्रू-प्रोपेलर यामुळे जहाजांची ताकद वाढली होती. त्याचा जहाजांच्या बांधणीवरही परिणाम झालेला दिसून येतो. स्वीडनमध्ये जन्मलेले संशोधक जॉन एरिकसन यांनी १८४४ साली यूएसएस प्रिन्सटन नावाची पहिली धातूची युद्धनौका अमेरिकी नौदलासाठी डिझाइन केली. त्यात स्क्रू-प्रोपेलरचा वापर केला होता.

sachin.diwan@ expressindia.com