आधुनिक क्षेपणास्त्रांचा विकास दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या व्ही-१ आणि व्ही-२ क्षेपणास्त्रांपासून सुरू झाला असला तरी चीन आणि भारतात अग्निबाणांचा वापर इ.स. १००० पासून होत आहे. शोभेच्या दारूकामासाठी वापरले जाणारे बाण हे अग्निबाणांचे अगदी प्राथमिक स्वरूप. त्यावरून भारतात सुरुवातीची क्षेपणास्त्रे बनवली गेल्याचे दाखले सापडतात. म्हैसूरचा राजा हैदर अली आणि त्याचा पुत्र टिपू सुलतान यांनी ब्रिटिशांविरुद्ध बांबूपासून बनवलेली रॉकेट वापरल्याचे इतिहासात उल्लेख आहेत. पोकळ आणि टोकदार बांबूमध्ये दारू भरून ते शस्त्रासारखे वापरले जात. टिपूच्या सैन्याने १७९०च्या दशकात श्रीरंगापटणमच्या लढाईत ब्रिटिशांविरुद्ध वापरलेली काही रॉकेट्स ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या बेंगॉल आणि बॉम्बे आर्टिलरीच्या तुकडय़ांनी हस्तगत केली होती. या अग्निबाणांना दिशादर्शन किंवा नियंत्रणाची काही सोय नव्हती. त्यावरून ब्रिटिश अधिकारी सर विल्यम काँग्रिव्ह याने रॉकेट विकसित केली. ती काँग्रिव्ह रॉकेट नावाने युरोपात वापरात होती.

क्षेपणास्त्रात दोन मूलभूत भाग असतात- पेलोड किंवा वॉरहेड आणि डिलिव्हरी व्हेईकल. पेलोड म्हणजे क्षेपणास्त्रात बसवलेला बॉम्ब किंवा स्फोटके. वॉरहेड टीएनटी, आरडीएक्स यांसारखी पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे, रासायनिक, जैविक अस्त्रांसारखी अपारंपरिक बॉम्बच्या स्वरूपात असू शकते. या स्फोटकांना त्यांच्या अपेक्षित लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वापरलेला अग्निबाण ही डिलिव्हरी व्हेईकल. क्षेपणास्त्राला गती देणाऱ्या यंत्रणा (प्रॉपल्शन सिस्टीम) दोन प्रकारच्या असतात – एअर ब्रिदिंग आणि नॉन एअर ब्रिदिंग. त्यात एअर ब्रिदिंगचे गॅस टर्बाइन इंजिन जेट आणि रॅमजेट असे उपप्रकार आहेत. तर नॉन एअर ब्रिदिंग प्रॉपल्शनचे सॉलिड, लिक्विड आणि हायब्रिड असे उपप्रकार आहेत.

Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
Iran attacks Israel four key questions
इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आता पुढे काय होणार? अमेरिकेची भूमिका काय?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?

क्षेपणास्त्रांचे विविध निकषांवर आधारित अनेक प्रकार पडतात. क्रूझ क्षेपणास्त्रे साधारणपणे हवेतून एखाद्या ग्लायडरसारखा प्रवास करतात. तर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तोफेच्या गोळ्यासारखी वक्राकार रेषेत प्रवास करत असल्याने त्यांना बॅलिस्टिक म्हणतात.

याशिवाय जमिनीवरून जमिनीवर किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर मारा करणारी (सरफेस टू सरफेस), जमिनीवरून हवेत मारा करणारी (सरफेस टू एअर), हवेतून जमिनीवर मारा करणारी (एअर टू सरफेस) आणि हवेतून हवेत मारा करणारी (एअर टू एअर) प्रकारची क्षेपणास्त्रे असतात. तसेच त्यांच्या लक्ष्यानुसार अ‍ॅण्टि-पर्सोनेल, अ‍ॅण्टि-टँक, अ‍ॅण्टि-एअरक्राफ्ट, शिप किंवा अ‍ॅण्टि-मिसाइल मिसाइल्स असतात. पल्ल्यानुसार क्षेपणास्त्रांचे शॉर्ट रेंज (५० ते १०० किमी.), मिडियम रेंज (१०० ते १५०० किमी), इंटरमिजिएट रेंज (१५०० ते ५००० किमी) आणि लाँग रेंज (५००० ते १२,००० किमी) असे प्रकार पडतात. दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना इंटरकॉण्टिनेण्टल बॅलिस्टिक मिसाइल (आयसीबीएम) किंवा आंतरखंडीय क्षेपणास्त्रही म्हणतात. तसेच पाणबुडी समुद्राच्या पाण्याखाली असताना तेथून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रेही डागता येतात. त्यांना सबमरीन लाँच्ड बॅलिस्टिक मिसाइल (एसएलबीएम) म्हणतात. एका क्षेपणास्त्रावर एकापेक्षा अधिक बॉम्ब बसवून ते एकाच वेळी वेगवेगळ्या लक्ष्यांवर सोडता येतात. त्यांना मल्टिपल इण्डिपेंडण्टली टार्गेटेबल रि-एण्ट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) म्हणतात. यातील एकेक बॉम्ब जर दिशा बदलू शकत असेल तर त्याला मल्टिपल मनुव्हरेबल रि-एण्ट्री व्हेईकल (एमएआरव्ही) म्हणतात.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com