ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित डंकर्क या २०१७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील एक दृष्य .. दुसऱ्या महायुद्धात १९४० च्या दरम्यान फ्रान्ससह निम्मा युरोप हिटलरच्या टाचेखाली निपचित पडलेला. डंकर्कच्या किनाऱ्यावर नाझी फौजांनी ब्रिटन आणि दोस्त राष्ट्रांच्या साधारण ४ लाख सैन्याची केलेली कोंडी. इंग्लिश खाडी पार करून माघार घेण्याऱ्या ब्रिटिश सैन्यावर जर्मन श्टुका डाइव्ह बॉम्बरचा हल्ला. आणि वैतागलेल्या ब्रिटिश सैनिकाच्या तोंडी संवाद – ‘व्हेअर इज द ब्लडी एअरफोर्स?’ .. संगीतकार हान्स झिमर यांचे टीपेला पोहोचणारे संगीतसूर आणि इंग्लिश खाडीवरील आसमंतात जर्मन मेशरश्मिट बीएफ-१०९ आणि ब्रिटिश सुपरमरीन स्पिटफायर यांच्या डॉगफाइट्स!

इतिहासात ‘बॅटल ऑफ ब्रिटन’ म्हणून गाजलेली ही लढाई प्रामुख्याने हवेत लढली गेली. ब्रिटनच्या गळ्याभोवती आवळलेला हा फास ढिला केला तो हॉकर हरिकेन आणि आणि सुपरमरीन स्पिटफायर ही विमाने आणि त्यांच्या मूठभर जिगरबाज वैमानिकांनी. ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी त्यांचा अभिमानाने ‘द फ्यू’ असा उल्लेख केला होता. त्यावेळी चर्चिल म्हणाले होते, ‘नेव्हर इन द फिल्ड ऑफ ह्य़ुमन कॉन्फ्लिक्ट वॉज सो मच ओड बाय सो मेनी टू सो फ्यू.’

Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD
‘शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे!’ Kalki 2898 AD चा टीझर प्रदर्शित; ‘अश्वत्थामा’च्या दमदार भूमिकेत आहेत अमिताभ बच्चन
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

बीएफ-१०९ हे त्या काळचे सर्वोत्तम लढाऊ विमान होते. त्याची रचना त्यापूर्वीच्या विमानांच्या तुलनेत नावीन्यपूर्ण होती. कँटिलिव्हर प्रकारच्या पंखांची एकच जोडी (मोनोप्लेन), वैमानिकाचे बंदिस्त कॉकपिट, मोनोकॉक एअरफ्रेम, उड्डाणानंतर पंखात दुमडली जाणारी चाके, हलक्या पण मजबूत झातूची बांधणी आदींमुळे त्याला हवेचा अवरोध कमी होऊन त्याचा वेग ताशी ६८५ किमी इतका वाढला होता. त्यावरील डाइम्लर इन्जेक्शन इंजिन स्पिटफायरवरील काबरेरेटर असलेल्या रोल्स रॉइस मर्लिन इंजिनापेक्षा सरस होते. त्यामुळे बीएफ-१०९ ला सूर मारताना इंधनाचा अखंड पुरवठा होत असे. मात्र स्पिटफायर सूर मारताना त्याचे  इंजिन थोडा वेळ इंधनपुरवठा खंडित होऊन बंद पडण्याचा धोका असे. तसेच बीएफ-१०९चा हवेत उंची गाठण्याचा वेग स्पिटफायरपेक्षा अधिक होता. स्पिटफायरचे लंबगोलाकार पंख त्याला अधिक वेगवान आणि चपळ  बनवत.

मात्र या दोन्ही विमानांच्या काही त्रुटी होत्या. बीएफ-१०९ चे कॉकपिट खूप अडचणीचे होते आणि त्यातून विमानाच्या बाहेर पाहण्याच्या क्षमतेवर बंधने येत असत. स्पिटफायरच्या वैमानिकाला अधिक विस्तृत क्षेत्रात पाहता येत असे. बीएफ-१०९ चा पल्ला ५६० किमी होता. तो फ्रान्समधून उड्डाण करून ब्रिटनपर्यंत जाऊन परतण्यासाठी अपुरा पडत असे. त्यामुळे बीएफ-१०९ विमाने जर्मन बॉम्बरना केवळ १० ते २० मिनिटे संरक्षण पुरवून गडबडीने परतत असत. ताशी ५७० किमी वेगाने ६६८ किमीपर्यंत प्रवास करू शकणारी स्पिटफायर त्याचा फायदा घेत. युद्धाच्या अखेपर्यंत ३३,००० बीएफ-१०९ आणि २०,००० स्पिटफायर विमाने बनवण्यात आली.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com