सचिन दिवाण

भारताचा स्वत:चा मेन बॅटल टँक (एमबीटी) असावा अशी कल्पना १९६० च्या दशकात पुढे येऊ लागली. ब्रिटिश आणि जर्मन रणगाडय़ांची चाचपणी करून ऑगस्ट १९६१ मध्ये ब्रिटिश व्हिकर्स लिमिटेड (नवे नाव व्हिकर्स डिफेन्स सिस्टिम्स) या कंपनीशी भारतासाठी रणगाडा विकसित करण्याचा करार करण्यात आला. त्यानुसार सुरुवातीला भारतासाठी रणगाडय़ाचे प्राथमिक प्रारूप (प्रोटोटाइप) बनवून ९० रणगाडे ब्रिटनमध्ये तयार करून भारताला देण्याचे ठरले. तसेच तामिळनाडूतील चेन्नईजवळील आवडी येथे स्वदेशी रणगाडा निर्मितीचा कारखाना उभारून ‘विजयंता’चे उत्पादन होऊ लागले. ब्रिटनमध्ये विजयंताची पहिली प्रारूपे १९६३ साली तयार झाली. त्यात सुधारणा करून जानेवारी १९६५ पासून आवडी येथील ‘हेवी व्हेईकल फॅक्टरी’मधून स्वदेशी विजयंता रणगाडय़ांचे उत्पादन होऊ लागले. तेव्हापासून १९८३ पर्यंत १२०० ते २२०० विजयंता रणगाडय़ांचे उत्पादन झाले. १९६५ पासून २००८ पर्यंत विजयंताने भारतीय चिलखती दलांना बळ पुरवले. बांगलादेश मुक्तीसाठी १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात ते प्रत्यक्ष वापरले गेले. विजयंता रणगाडय़ाच्या मूळ संरचनेत थोडे बदल करून ‘कॅटापुल्ट सेल्फ प्रोपेल्ड आर्टिलरी’ (स्वयंचलित तोफ), ‘कार्तिक आर्मर्ड व्हेईकल-लाँच्ड ब्रिज’ (पूल उभे करण्याचे यंत्र) आणि ‘विजयंता आर्मर्ड रिकव्हरी व्हेईकल’ अशी चिलखती वाहने बनवण्यात आली. डिझेल इंजिनवर चालणारा ४३ टनी विजयंता ताशी ५० किलोमीटरच्या वेगाने ५३० किलोमीटपर्यंत मजल मारू शकत असे. त्याचे चिलखती आवरण ८० मिलीमीटरचे होते आणि त्यावर १०५ मिलीमीटर व्यासाची मुख्य तोफ आणि मशीनगन्स बसवल्या होत्या.

First Secretary Anupama Singh
“जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात…”, भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
maryam nawaz pakistan s first woman chief minister maryam nawaz sharif in pakistani
विश्लेषण : मरियम नवाझ शरीफ.. बेनझीर भुत्तोंनंतर पाकिस्तानी राजकारणाची दिशा बदलणारी दुसरी महिला!
Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ
President Ram Nath Kovind and narendra modi
भाजपा अन् देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना; ४० वर्षांपूर्वीचा इतिहास काय?

तिसऱ्या पिढीतील अत्याधुनिक आणि स्वदेशी अर्जुन रणगाडय़ावर १९७२ पासून काम सुरू झाले. आवडी येथील ‘कॉम्बॅट व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट’ (सीव्हीआरडीई) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांनी त्याची संरचना केली असून आवडी येथील ‘हेवी व्हेईकल फॅक्टरी’मध्ये त्याचे उत्पादन होते. विलंब आणि त्रुटींमुळे अर्जुनच्या उपयुक्ततेवर टीकाही झाली. मे १९७४ मध्ये त्यासाठी १५ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. ‘डीआरडीओ’ने १९९५ पर्यंत या प्रकल्पावर तीन अब्ज रुपये खर्चूनही प्रत्यक्ष रणगाडा काही लष्कराला मिळाला नव्हता. तातडीची गरज भागवण्यासाठी १९९० आणि २००० च्या दशकात रशियाकडून ‘टी-९०’ (भीष्म) रणगाडे घ्यावे लागले. अखेर लष्कराने २००० साली १२४ अर्जुन रणगाडय़ांची मागणी नोंदवली. आवडी येथील कारखान्यात त्यांचे उत्पादन सुरू होऊन २००४ साली पहिल्या तुकडीतील १६ रणगाडे लष्कराला मिळाले. सध्या एका अर्जुन रणगाडय़ाची किंमत ५५ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे.

अर्जुनवर १२० मिलीमीटर व्यासाची मुख्य तोफ आणि ७.६६ मिमी व १२.७ मिमीच्या मशीनगन्स आहेत. त्याचे डिझेल इंजिन १४०० अश्वशक्तीचे असून अर्जुन सपाट जमिनीवरून ताशी ६७ किलोमीटरच्या तर ओबडधोबड जमिनीवरून ४० किमी प्रति तास वेगाने प्रवास करू शकतो. तो चालवण्यासाठी कमांडर, गनर, लोडर आणि ड्रायव्हर अशा चार जणांची गरज भासते.  ‘अर्जुन’साठी ‘कांचन’ नावाचे मोडय़ुलर कॉम्पोझिट प्रकारचे चिलखती आवरण विकसित करण्यात आले आहे. अर्जुन मार्क-१, मार्क-२ आणि ‘टँक-एक्स’ अशी त्याची मॉडेल्स विकसित करण्यात आली आहेत. भारतीय लष्कराने आजवर अर्जुन मार्क-१ प्रकारच्या २२४ आणि मार्क-२ प्रकारच्या ११८ रणगाडय़ांची मागणी नोंदवली आहे.

sachin.diwan@ expressindia.com