केवळ एक लक्षवेधी कल्पना असलेल्या रिव्हॉल्व्हरला मूर्त व्यावसायिक रूप देण्याचे काम जरी सॅम्युएल कोल्ट यांचे असले तरी त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन एकत्रित काडतूस (सेल्फ कण्टेण्ड कार्ट्रिज) विकसित करून त्यावर आधारित रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुले बनवण्याची किमया साधली ती ‘स्मिथ अ‍ॅण्ड वेसन’ (Smith & Wesson) या कंपनीने. कोल्ट आणि स्मिथ अ‍ॅण्ड वेसन यांची कहाणी सुरुवातीला सहकार्याची आणि नंतर तीव्र व्यावसायिक स्पर्धेची असल्याने तितकीच रोमांचक आहे.

स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीच्या नावातील भागीदार डॅनिएल वेसन यांचे थोरले बंधू एडविन वेसन हे अमेरिकेतील १८४०च्या दशकातील प्रसिद्ध नेमबाज आणि बंदूक निर्माते होते. एडविन यांच्या हाताखाली घरच्याच बंदुकीच्या कारखान्यात डॅनिएल यांनी उमेदवारी केली. त्या काळात सॅम्युएल कोल्ट यांच्या रिव्हॉल्व्हर बाजारात दाखल झाल्या होत्या. अमेरिका-मेक्सिको युद्धादरम्यान कोल्ट यांच्या वॉकर रिव्हॉल्व्हरच्या काही सुटय़ा भागांचे उत्पादन करण्याचे काम (सब-कॉन्ट्रॅक्ट) वेसन बंधूंना मिळाले होते. एडविन आणि डॅनिएल वेसन यांनीही त्यांच्या स्वत:च्या रिव्हॉल्व्हरचे डिझाइन तयार केले होते आणि ते बाजारात आणण्यास दोघे बंधू उत्सुक होते.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

मात्र जानेवारी १८४९ मध्ये एडविन वेसन यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि वेसन यांची कंपनी कर्जबाजारी बनली. एडविन यांच्या स्वप्नातील रिव्हॉल्व्हर बनवण्याचा डॅनिएल यांचा प्रयत्न होता. पण त्याकाळी रिव्हॉल्व्हरचे पेटंट सॅम्युएल कोल्ट यांच्याकडे असल्याने त्यात अडथळा आला. कोल्ट आणि वेसन यांच्यात चाललेला रिव्हॉल्व्हरवरील बौद्धिक स्वामित्व हक्काचा खटला कोल्ट यांनी जिंकला आणि त्यांच्या पेटंटला मुदतवाढ मिळाली. या प्रसंगानंतर सॅम्युएल कोल्ट आणि डॅनिएल वेसन हे कायमचे प्रतिस्पर्धी बनले.

डॅनिएल वेसन यांनी १८५२ साली होरेस स्मिथ या त्या वेळी अमेरिकी बंदूक उद्योगात स्थिरावलेल्या ज्येष्ठ  व्यावसायिकाशी भागीदारी केली. त्यातूनच स्मिथ अ‍ॅण्ड वेसन या कंपनीची निर्मिती झाली. पुढे तेही बंदूक उद्योगातील मोठे नाव बनले. स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनीने बाजारात आणलेले पहिले रिव्हॉल्व्हर ‘व्होल्कॅनिक’ नावाने ओळखले गेले. यातून एका मागोमाग एक डागल्या जाणाऱ्या गोळ्या एखाद्या ज्वालामुखीच्या उद्रेकासारख्या भासत. त्यावरून त्याला व्होल्कॅनिक नाव पडले. त्यासाठी तयार केलेल्या व्होल्कॅनिक काटिर्र्जचे स्मिथ आणि वेसनने १८५४ मध्ये पेटंट घेतले. सॅम्युएल कोल्ट यांच्या रिव्हॉल्व्हरच्या पेटंटची मुदत १८५६ साली संपत होती.

तोपर्यंत स्मिथ अ‍ॅण्ड वेसनच्या व्होल्कॅनिकमध्येही अनेक सुधारणा केल्या गेल्या. नवीन रिव्हॉल्व्हरचा आराखडा मूर्त स्वरूप घेत होता. त्यांनी जुन्या .२२ कॅलिबर काडतुसामध्ये सुधारणा केल्या होत्या. या वेळपर्यंत कोल्ट यांच्या पेटंटचा अडसरही दूर झाला होता. आता स्मिथ अ‍ॅण्ड वेसन कंपनी कोल्टला टक्कर देण्यास सज्ज होती.

sachin.diwan@expressindia.com