संयुक्त अरब अमिराती आणि इतर आखाती देशांतील मराठी नागरिकांसाठी यंदा ‘आखातीमराठी’ वेबसाईट आयोजित आणि ‘पीएनजी ज्वेलर्स’ पुरस्कृत गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चितळे बंधू व व्हिको लॅबॉरोटरीज हे सहप्रायोजक आहेत.
भाद्रपद महिन्यातील गणेश चर्तुर्थीपासून म्हणजेच ५ सप्टेंबरपासून १७ सप्टेंबरपर्यंत आखाती देशांतील नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येईल, अशी माहिती स्पर्धा संयोजकांनी दिली.
कुवेत, ओमान, कतार, बहारीन, सौदी अरेबिया या देशांसह संयुक्त अरब अमिरातीतील मराठी नागरिक या स्पर्धेत सहभागी घेऊ शकतील. स्पर्धेच्या काळात www.ganeshsajavat.aakhatimarathi.com या वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करून गणेशभक्त या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. स्पर्धेत सहभागी होणाऱय़ांना घरातील गणपती सजावटीचे फोटो साईटवर अपलोड करायचे आहेत. या फोटोंना ४० टक्के मते, ३० परीक्षक आणि ३० टक्के सजावट यावर स्पर्धेतील विजेते निवडण्यात येणार आहेत.
स्पर्धेचा कालावधी संपल्यानंतर सात दिवसांमध्ये विजेत्यांची घोषणा करण्यात येईल. स्पर्धेविषयी आणखी माहिती मिळवण्यासाठी वाचक aakhatimarathi.com या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2016 3:48 pm