21 February 2019

News Flash

घरचा गणेश : बाप्पा आमच्या घरचा!

घरातील गणपती आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो पाठवा.

गणपती तुझे नाव चांगले |
आवडे बहु चित्त रंगले ||
प्रार्थना तुझी गौरी नंदना |
हे दयानिधे! श्रीगजानना ||

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि ‘सुखकर्ता’ असलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनाने घरातील वातावरण आनंददायी आणि चैतन्यमय होते. गणपतीची मूर्ती कशी असावी ते मूर्ती भोवती करण्यात येणारी आरास कशी असावी यापर्यंत घरातील लहान-थोरांमध्ये चर्चा रंगतात. घरात विराजमान झालेल्या अशा या बाप्पाचे छायाचित्र लोकसत्ता डॉट कॉमवर प्रसिद्ध करण्याची संधी वाचकांना देण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे या वर्षीदेखील ‘घरचा गणेश’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घरातील गणपती आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो loksatta.express@gmail.com या ई-मेलवर पाठवा.

सब्जेक्टमध्ये ‘घरचा गणेश’ लिहिण्यास विसरू नका. मेलमध्ये आपले नाव आणि राहण्याचे ठिकाण अवश्य लिहा. निवडक फोटोंचा अल्बम ‘लोकसत्ता डॉट कॉम’वर प्रसिद्ध केला जाईल. त्याचप्रमाणे या अल्बमची लिंक लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरदेखील शेअर करण्यात येईल. सर्वोत्कृष्ट फोटो ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर कव्हर फोटो म्हणून झळकेल.

First Published on August 29, 2016 3:26 pm

Web Title: gharcha ganesh 2016