08 March 2021

News Flash

दिग्गज क्षेत्ररक्षकाने क्रिकेटच्या देवाच्या घरी जाऊन घेतले बाप्पाचे दर्शन

'इंडिया'चे पिता प्रभुच्या दर्शनाला आल्याचे सांगत सचिनने शेअर केला जॉन्टींसोबतचा फोटो

छाया सौजन्य- ट्विटर

मैदानात आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाने सर्वाना भुरळ पाडणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक असलेल्या जॉन्टी ऱ्होड्सने सोमवारी सचिन तेंडुलकरच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. आपल्या मुलीचे नाव ‘इंडिया’ असे ठेऊन भारताविषयीचे प्रेम प्रकट करणाऱ्या जॉन्टीनेआपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसा दिवशी भारतीय पारंपारिक पद्धतीत मुंबईतील एका मठात पूजा केली होती. त्याने मुंबईतील केलेल्या पूजेचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याला भारतीय परंपरेवर श्रद्धा असल्याचे दिसून आले होते. याच श्रेद्धेची आणखी एक झलक जॉन्टींने सचिनच्या घरात हजेरी लावून दाखवून दिली. जॉन्टीने घरी येऊन बाप्पाचे दर्शन घेतल्याचे फोटो सचिन तेंडुलकरने ट्विटरवर शेअर केले आहेत. सर्वप्रथम सचिनने जॉन्टी दर्शन घेत असतानाचा फोटो शेअर केला. या फोटोच्या खाली सचिनने आपल्या चाहत्यांना कोण दर्शनासाठी आले आहे ओळखलत का? असा सवाल केला होता. त्यानंतर थोड्या वेळाने  ‘इंडिया’चे पिता प्रभुच्या दर्शनाला आल्याचे सांगत जॉन्टींसोबतचा दुसरा फोटो सचिनने शेअर केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 12:02 am

Web Title: jontyrhodes visit sachin tendulkar house for bappas blessings
Next Stories
1 ‘बाप्पासाठी कोकणातला जुना मोठा वाडा उघडला जातो’
2 ‘लालबागचा राजा, दगडूशेठचा गणपती यांच्याशी तुलना करून काय उपयोग?’
3 पर्यावरणपूरक गणेश मूर्ती खरेदी करण्याकडे कल
Just Now!
X