16 February 2019

News Flash

गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठा सजल्या

काही वस्तूंच्या किमती गेल्या वर्षी इतक्याच असून काही वस्तूंमध्ये किरकोळ स्वरूपाची भाववाढ झाली आहे.

 

गणरायाचे सोमवारी वाजत, गाजत, नाचत, गर्जत आगमन होत आहे. त्यानिमित्त आवश्यक असणाऱ्या विविध वस्तूंनी वसईतील सर्वच बाजारपेठा सजल्या आहेत. निरनिराळ्या साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिक, महिलांची गर्दी वाढू लागली आहे. काही वस्तूंच्या किमती गेल्या वर्षी इतक्याच असून काही वस्तूंमध्ये किरकोळ स्वरूपाची भाववाढ झाली आहे.

गणपतीला लागणाऱ्या मोत्याच्या आणि मोदकाच्या कंठीमाळा, विविधरंगी मुकुट, लहान-मोठय़ा आकाराच्या अगरबत्ती, गणपती शाल, कापूर आणि अन्य पूजेच्या साहित्यांनी वसईतील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. वसईतील आनंद नगर बाजारपेठ, झेंडा बाजार, विरार येथील रेल्वे स्थानकाजवळील बाजारपेठ, बोळिंज येथील बाजार, सोपारा मार्केट या महत्त्वाच्या बाजारपेठा मानल्या जातात. यंदा गणेशोत्सवाचे औचित्य साधून व्यापाऱ्यांनी ग्राहकांच्या पसंतीनुसार विविध साहित्य दुकानांमध्ये मांडले आहे.

वस्तूंच्या किमती

  • मोत्याच्या कंठय़ा : १२५ रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंत
  • लहान-मोठय़ा अगरबत्त्या : ३० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत
  • गणपतीची शाल : ६० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत
  • विविधरंगी गणपती मुकुट : १२५ रुपयांपासून ते १८० रुपयांपर्यंत

गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची उत्सवाच्या काळातच विक्री करावी लागते. त्यामुळे दरवर्षी नवीन सामान आणतो आणि त्याची विक्री करतो.  त्यामुळे गेल्या वर्षी इतक्याच किमती यंदाही आहेत.

– दीपक म्हात्रे, मनोज म्हात्रे, वसईतील पूजेच्या साहित्याचे विक्रेते

First Published on September 3, 2016 1:58 am

Web Title: market ready for ganpati festivals 2