20 February 2019

News Flash

पेणमधून यंदा ४० हजार गणेशमूर्ती परदेशात

दरवर्षी जवळपास २५ लाख गणेश मूर्त्यां तयार केल्या जातात, ज्या देशविदेशांतही पाठवल्या जातात.

आशियाई, आखाती देशांतून पहिल्यांदाच मागणी ; अमेरिका-कॅनडापर्यंत झेप, देशभरातूनही मोठा प्रतिसाद

संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या पेणच्या सुबक आणि सुंदर गणेशमूर्तीचा डामडौल यंदा परदेशामध्येही मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळणार आहे. गणेश मूर्तिकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून यंदा तब्बल ४० हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत.

पेण शहराला गणेश मूर्तिकलेचा १५० वर्षांचा इतिहास लाभला आहे. कै. वामनराव देवधर यांनी सुरू केलेला गणेशमूर्ती बनवण्याचा व्यवसाय आता पेण शहर आणि आसपासच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात फोफावला आहे.  पेण शहरात गणेशमूर्ती बनवणारे १५० मूर्तिकार कार्यरत आहेत, तर जोहे, हमरापूर, वडखळ आणि कामार्ले परिसरात गणेशमूर्ती बनवणाऱ्या ४०० हून अधिक कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी जवळपास २५ लाख गणेश मूर्त्यां तयार केल्या जातात, ज्या देशविदेशांतही पाठवल्या जातात. या मूर्तिकला व्यवसायातून दरवर्षी २५ ते ३० कोटींची उलाढाल होत असते. पूर्वी राज्यातील विविध भागांबरोबरच गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशदरवर्षी जवळपास २५ लाख गणेश मूर्त्यां तयार केल्या जातात, ज्या देशविदेशांतही पाठवल्या जातात. दरवर्षी जवळपास २५ लाख गणेश मूर्त्यां तयार केल्या जातात, ज्या देशविदेशांतही पाठवल्या जातात. , गुजरात आणि पश्चिम बंगालमधून पेणच्या गणपतींना विशेष मागणी होत होती. आज मात्र देशातील विविध भागांबरोबरच परदेशातूनही पेणच्या गणेशमूर्तीना मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी पेणमधून परदेशात पाठवण्यात येणाऱ्या गणेशमूर्तीची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याचे मूर्तिकार सांगतात.

विदेशवारी कुठे?

  • या वर्षी पेण परिसरातून तब्बल ४० हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने थायलंड, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, फिजी, अमेरिका, कॅनडा, मॉरिशस यांसारख्या देशांचा समावेश आहे.
  • महत्त्वाची बाब म्हणजे आखाती देशांतील दुबईसारख्या शहरांतून यंदा पेणच्या गणेशमूर्ती मागविण्यात आल्या आहेत. जेएनपीटी बंदरातून जगभरात या मूर्त्यां जून आणि जुलै महिन्यात पाठवण्यात आल्या आहेत.

बँकॉक येथून सात जणांचे एक पथक या वर्षी पेणमध्ये दाखल झाले होते. त्यांनी पेणमधील गणेशमूर्ती व्यावसायिकांना भेट दिली. गणपती कसे तयार केले जातात, हा व्यवसाय कसा चालतो याचा अभ्यास केला, आणि १ हजार लहान गणेशमूर्तीची मागणी नोंदविली.

– नीलेश समेळ, गणेश मूर्तिकार, पेण

दरवर्षी परदेशात जाणाऱ्या गणेशमूर्तीची संख्या वाढते आहे. त्याचबरोबर देशाबरोबरच परदेशांतून आता पेणच्या गणेश मूर्तिकारांना त्यांची मूर्तिकला दाखवण्यासाठी आमंत्रित केले जाऊ  लागले आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात मराठी मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात पेण येथील गणेश मूर्तिकला या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गणेशमूर्ती कशा बनतात. याची प्रात्यक्षिके या कार्यशाळेत दाखवण्यात आली. परदेशी नागरिक यात उत्साहाने सहभागी झाले.

– श्रीकांत देवधर, अध्यक्ष,  पेण गणेश मूर्तिकार संघटना

First Published on August 30, 2016 1:48 am

Web Title: pen ganesh idol goes to foreign