देखाव्यातून स्त्रीभ्रूणहत्येविरोधात जनजागृती, महाड दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना आदरांजली

उरण तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणेच घरगुती सजावटीतूनही सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करण्यात आलेले आहेत. उरणमधील एका गावात स्त्रीभ्रूणहत्येसंबंधी जनजागरण करणारा देखावा तयार करण्यात आलेला आहे, तर एका घरगुती गणपतीच्या देखाव्यातून महाडच्या सावित्री नदीवरील पूल कोसळल्याने मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांंच्या जमिनींचा शोध, सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न – जे. पी. गावित यांचा आरोप
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

गणेशोत्सवात वर्षभरात घडलेल्या चांगल्या, वाईट तसेच आपत्तीच्या घटनांचा आढावा घेतला जातो. यात समाजाचे प्रबोधन हा प्रमुख उद्देश असतो. चलचित्र तसेच देखाव्यांच्या माध्यमातून याची मांडणी केली जाते. अनेक गणेश मंडळे या वर्षीचा विषय काय असावा यावर विचार करून त्याची माहिती घेत हे देखावे तयार करतात, तर काही मंडळांकडून समाजोपयोगी कामे करून प्रत्यक्षात सामाजिक संदेशाची अंमलबजावणीही केली जाते.

घरगुती गणेशाची आरास करतानाही सामाजिक बांधिलकी म्हणून काही जण आपल्या घरात देखावे तयार करीत आहेत.

दिघोडे येथील डी. डी. कोळी यांनी या वर्षी निसर्गाचे संरक्षण करणाऱ्या पडद्याच्या मखरातून देखावा तयार केला आहे. या देखाव्यातून त्यांनी महाड येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहत महाडच्या सावित्री नदीवरील पुलाचे चित्र साकारलेले आहे. तर गोवठणे गावातील शिक्षक असलेल्या दीपक वसंत पाटील यांनी आपल्या घरात स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचा संदेश देणारा चलचित्राचा देखावा साकारला आहे. यात त्यांनी बेटी बचाव, बेटी पढाव हा संदेशही दिला आहे. या वेळी त्यांनी समाजात स्त्री-पुरुषांमध्ये भेदभाव केला जाऊ नये हा संदेश देण्याचा उद्देश असल्याचे सांगितले.