News Flash

गणरायांसाठी सावंतवाडीची बाजारपेठ फुलली

संध्याकाळी पावसाने भक्तांची थोडी धांदल निर्माण केली, पण तरीही भाविकांची गर्दी मात्र कायम होती.

गौरी-गणपती सणासाठी रेल्वेने येणारा चाकरमानी दोन ते तीन तास उशिराने धावणाऱ्या रेल्वेमुळे वैतागून गेला. तेजस रेल्वे दोन तास उशिराने धावत होती. तसेच आंबोली घाटातील रस्ता खचल्याचा सोशल मिडियाचा खोटा संदेशही प्रवाशांत भीती निर्माण करणारा ठरला. स्थानिक बाजारपेठा आज सजल्या व ग्राहकांनी फुलून देखील होणाऱ्या गौरी-गणपती सणाच्या पाश्र्वभूमीवर भक्तांची लगबग वाढली होती. सावंतवाडी शहरातील बाजारपेठेत गौरी-गणपती सणासाठी लागणाऱ्या सामानाची दुकाने आज गर्दी करून गेली. संध्याकाळी पावसाने भक्तांची थोडी धांदल निर्माण केली, पण तरीही भाविकांची गर्दी मात्र कायम होती.

आंबोली घाट रस्ता खचल्याचा खोटा संदेश व्हॉट्स अ‍ॅपवरून सकाळीच प्रवासी वर्गाला त्रस्त करणारा दिला गेल्याने क्षणात लोकांनी त्याबाबत विचारणा करुन खात्री करुन घेतली. यानंतर सार्वजनिक बांधकामाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चेन, उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी घाट रस्ता खाली केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सर्व घाट वाहतुकीस सुरळीत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीपकुमार गेडाम यांनी प्रसिद्धीस पत्रक देऊन जाहीर केले. सोशल मीडियाच्या या गैरवापराने यंत्रणा मात्र कामाला लागली.

मुंबई-गोवा धावणाऱ्या खासगी बसचालकांनी प्रवाशांना सावंतवाडीपर्यंत सोडावे. त्यांनी झाराव व मळगाव येथे प्रवाशांना सोडले तर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील आरटीओनी दिला. तसेच रिक्षा चालकांनी प्रवाशांचे भाडे नाकारणे, उद्धट बोलणे व अव्वाच्या सव्वा भाडे घेतल्यास कारवाई करण्याचा इशारादेखील आरटीओनी दिला.

कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे गाडय़ा तीन तास उशिराने धावत होत्या. तेजस ही अत्याधुनिक रेल्वेदेखील दोन तास उशिराने धावली. त्यामुळे प्रवाशात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली.

कोकण रेल्वे मार्गावर उशिराने रेल्वे धावत असल्याने चाकरमानी मंडळीचे प्रचंड हाल झाले. कोकण कन्या, दिवा पॅसेंजर, जनशताब्दी, तुतारी, मांडवी या गाडय़ात प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. गणेश उत्सवासाठी चाकरमानी मोठय़ा संख्येने गावी आले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 1:27 am

Web Title: ganapati utsav celebration at sawantwadi ganapati utsav ganesh utsav 2017
Next Stories
1 ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या पेजवर असा अपलोड करा तुमच्या घरच्या बाप्पाचा फोटो
2 पुण्यात लाडक्या गणपती बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी
3 Video: गणेशोत्सव साजरा करण्यापूर्वी बाप्पाचा हा संदेश नक्की पाहा!
Just Now!
X