News Flash

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या ‘रॉयलस्टोन’ निवासस्थानी ‘श्रीं’ चे उत्साहात आगमन

राज्यभरातील अनेक भागांत उत्साहाचे वातावरण

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबई येथील ‘रॉयलस्टोन’ या शासकीय निवासस्थानी आज गणरायाचे उत्साहात आगमन झाले. पंकजा मुंडे आणि त्यांचे पती डॉ अमित पालवे यांनी ‘श्रीं ‘ची पूजा करून प्रतिष्ठापना केली. यावेळी प्रज्ञाताई मुंडे, आर्यमान पालवे आदी उपस्थित होते. गणपतीची अतिशय देखणी व सुबक मूर्ती आणि त्यासमोर  विविध प्रकारच्या फुलांची आरास यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. राज्यातील नागरिकांची विघ्ने दूर व्हावीत, मराठवाडा, विदर्भात अपुऱ्या पावसामुळे बळी राजावरील संकट दूर व्हावे, त्यासाठी भरपूर पाऊस पडू दे, अशी प्रार्थना पंकजा मुंडें यांनी केली.

सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे पहाटेपासूनच राज्यभरातील अनेक भागांत उत्साहाचे वातावरण दिसून आले. मुंबईसह उपनगरात जोरदार सरी बरसल्या. पावसाच्या सरी कोसळत असताना भाविकांनी रिक्षा, मालवाहू टेम्पो, कार आणि मोटरसायकलींवरून भक्त गणेशमूर्ती घरी घेऊन येत होते. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात मूर्ती मंडळांमध्ये नेल्या. राज्यभरात सुरु असलेला उत्साह पंकजा मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी देखील दिसून आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 6:20 pm

Web Title: ganesh chaturthi 2017 pankaja munde welcomes ganpati in mumbai home
Next Stories
1 जाणून घ्या दीड दिवसांनी गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यामागची प्राचीन परंपरा
2 Ganesh Chaturthi 2017: गणपती माझा नाचत आला!; मुंबई, पुण्यासह अवघा महाराष्ट्र भक्तीरसात चिंब
3 Ganesh Utsav 2017: जाणून घ्या गणपतीच्या या रुपांविषयी…
Just Now!
X