News Flash

गौरी सजावटीतून ‘स्वच्छ भारत’चा संदेश, माढ्यातील महिलेचा अनोखा उपक्रम

गौरी पाहण्यासाठी आलेल्या महिलांना प्रबोधनात्मक पुस्तके भेट देत आहेत.

माढ्यातील (जि. सोलापूर) शारदा शिंदे यांनी आपल्या घरी पारंपारिक गौरी सजावटीला फाटा देत स्वच्छतेचा संदेश देत स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा दिला आहे.

माढ्यातील (जि. सोलापूर) शारदा शिंदे यांनी आपल्या घरी पारंपारिक गौरी सजावटीला फाटा देत स्वच्छ भारत अभियानाची आरास उभारून सर्वांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे. आपले गाव स्वच्छ व सुंदर करून हागणदारीमुक्त करण्यासंदर्भातील पुस्तके त्यांनी गौरींसमोर ठेवले आहेत.

गौरींसमोर खाद्यपदार्थ, खेळणी, विद्युत रोषणाई केली जाते. परंतु, शारदा शिंदे यांनी मात्र गौरी पाहण्यास आलेल्या महिलांना वैचारिक मेजवानी मिळावी यांसाठी प्रबोधनात्मक फलक व विविध प्रकारची ४०० हून अधिक पुस्तकांनी गौरींची सजावट केली आहे.

शिंदे यांनी परिसर, घर आणि गाव स्वच्छतेसाठी लागणारे सुपली, झाडू, कचराकुंडी आदी साहित्य गौरी समोर मांडले आहेत. गौरीसमोर पुरुष व स्त्रीची प्रतिकृती साकारून त्यांच्या हातात स्वच्छते बाबतचे पोस्टर देण्यात आले आहेत. या उपक्रमात शारदा शिंदे यांनी धनश्री शिंदे, दत्ताजी शिंदे, संदीप शिंदे, जयदीप शिंदे, शिवतेज शिंदे यांच्या मदतीने हे आरास उभे केले आहे. गौरी पाहण्यासाठी आलेल्या महिलांना शारदा शिंदे या प्रबोधनात्मक पुस्तके भेट देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2017 9:02 pm

Web Title: ganesh festival 2017 swachh bharat message from gauri carnival unique initiative of woman in madha
Next Stories
1 Ganesh Utsav 2017 माहेरचा गणपती : ‘माझा जन्म अनंत चतुर्दशीचा’
2 विधायक : सामाजिक उपक्रमांचे ‘सेवा मित्र मंडळ’
3 आवाढव्य उलाढालीचा आणि प्रायोजकांचा उत्सव
Just Now!
X