साहित्य : केळ्यांचा पल्प १ वाटी, चक्का १/२ वाटी, साखर दीड वाटी, वेलदोडे ३-४.

कृती : केळ्याचा पल्प मऊ करून घ्या. एका पॅनमध्ये चक्का, पल्प आणि साखर एकत्र करून घ्या. मंदाग्नीवर शिजायला ठेवा. चांगले शिजवून गोळी, ताटलीत टाकून पाहा. सुटी झाली की गॅसवरून उतरवून, व्यवस्थित घोटून घ्या. कणके सारखा गोळा करून घ्या. मोदकाच्या प्लास्टिकच्या लहान साच्यात, मिश्रणाचा लहान गोळा घालून मोदक करून घ्या.
केळ्याचे आंबट गोड मोदक खूप टेस्टी लागतात !!!!

सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ