20 September 2020

News Flash

Ganesh Utsav Recipes 2017 : बीटाचे मोदक

आरोग्यदायी खिरापत

प्रातिनिधिक छायाचित्र

साहित्य : बीटाचा कीस २ वाट्या, साखर १ वाटी, खवा १ वाटी, वेलदोडे ४-५

कृती : बीटाचा कीस कुकरमध्ये वाफवून घ्यावा. नंतर घोटून घ्यावा. पॅनमध्ये बीटाचा कीस आणि खवा एकत्र करून ५ मिनिटे परतावे. वेलची पावडर घाला. साखर घालून ढवळून आटवा. ताटात थेंब टाकून गोळी होते का बघा. गोळी होत असेल तर गॅसवरून उतरवून घोटून घोटून घट्ट गोळा बनवावा. गार करून घ्या. मोदकाच्या प्लास्टिकच्या बारीक साच्यामध्ये तूप लावून घ्या. मिश्रणाचा गोळा साच्यात घालून मोदक तयार करून घ्या.

हे मोदक घरातील सगळ्यांसाठीच पोषणमूल्य देणारे असतात. अतिशय सुंदर रंगाचे मोदक मुलांबरोबर सगळ्यांनाच खूप आवडतील. साच्यामध्ये मोदक चिकटत असतील तर मिश्रण १-२ तास फ्रीज मधे ठेवून नंतर करावे. आवडत असेल तर ड्रायफ्रूटसचा पण वापर करु शकता.

सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 11:31 am

Web Title: ganesh utsav 2017 healthy recipes beet modak
Next Stories
1 Ganesh Visarjan 2017 : …आणि अशी सुरु झाली पाच दिवसांनी गणेशमूर्ती विसर्जन करण्याची परंपरा
2 गणपती हा तीन धर्माचा आणि आशिया खंडाचा सर्वमान्य देव
3 ५० वर्षांतून एकदाच विसर्जन
Just Now!
X