पिंपरी चिंचवडमधील सांगवी येथे राहणाऱ्या भागवत कुटुंबीयांनी यावर्षी आपल्या घरच्या गणपतीसाठी अतिशय आगळावेगळा आणि जागृती करणारा देखावा साकारला आहे. दुष्काळग्रस्त गावाचं वॉटर कप स्पर्धेने कशा पद्धतीने रुप पालटंवलं या पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमाची प्रतिकृती त्यांनी केली आहे. यासाठी कुटुंबातील प्रत्येक जण मागील महिनाभर अहोरात्र कष्ट घेत आहे.

भागवत कुटुंबाने वर्ध्यातील काकडदरा गावचा दुष्काळ आणि सुकाळ अशी दोन्ही रूपं घरगुती गणपती बाप्पाच्या पुढे सादर केली आहेत. या गावात कायमच दुष्काळ असल्याने येथील नागरिक हैराण झाले होते, परंतु पाणी फाउंडेशनने वॉटर कप स्पर्धेची घोषणा केली आणि हे गाव कसं ‘सुजलाम सुफलाम’ झालं हे घरगुती देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न सांगवीतील भागवत कुटुंबीयांनी केला आहे. पिंपरी चिंचवड भागात राज्यभरातील दुष्काळी भागातील लोक मोठ्या संख्येने उदरनिर्वाहासाठी स्थायिक झाले आहेत. यापैकी बरीचशी मंडळी भागवत कुटुंबीयांचा देखावा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थिती दर्शवतात. याच दुष्काळग्रस्त जनतेला पाणी फाउंडेशनचे कार्य दाखवण्याचा या देखाव्यामागचा हेतू आहे.

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
pimpri chinchwad, Maval Lok Sabha ransangram, program, Debates, Discussions, candidate, political party members, srirang barane, sanjog waghere, bjp, shivsena, congress, elections 2024, maharashtra politics, marathi news,
पिंपरी : आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे आणि घोषणाबाजी… परखड चर्चेमुळे चिंचवडला रंगला मावळचा रणसंग्राम
balmaifal article, kids, eco friendly, rangpanchami, celebration, environment, save water, natural colour, plantation, children,
बालमैफल : आगळी रंगपंचमी

देखाव्यात भागवत कुटुंबीयांनी गणपतीच्या उजव्या बाजूला दुष्काळ ग्रस्त गाव दाखवलं आहे. पाण्याच्या नियोजनाअभावी पाऊस पडून देखील पाण्याची साठवणूक करण्यात नागरिक कमी पडतात. त्यामुळं गावावर पाण्याचं संकट येतं आणि दुष्काळ पडतो. अशा पद्धतीचा देखावा सादर केला आहे. तर डाव्या बाजूला अहोरात्र कष्ट करून नागरिकांनी पाझर तलाव, बंधारा, तळे, समतल चर, नाले इत्यादी कामे वॉटर कपच्या माध्यमातून केली असल्याचे दाखविण्यात आले आहे. या सगळ्यामुळे विहिरीचा वाढलेला पाणीसाठा, एकूणच पाण्याचे प्रमाण दाखविण्यात आले आहे. पाऊस किती पडतो, यापेक्षा या पावसाचे पाणी जर आपण योग्य पद्धतीने जिरवले तर कशी हरितक्रांती होते हेच भागवत कुटुंबीयांनी आपल्या देखाव्यातून दाखवून दिले आहे.