साहित्य : तांदुळाचा रवा २ वाट्या, पपईचा रस ४ वाट्या, गूळ / साखर १/४ वाटी, तूप २-३ चमचे, वेलची पूड २ चमचे, मीठ चवीपुरतं, पाणी १/२ वाटी.

कृती : तांदूळ धुवून, वाळवून, मिक्सरमध्ये रवा काढून घ्या. पिकलेल्या पपईचा मिक्सर किंवा juicer मधून रस काढून घ्या. कढई मध्ये तूप घालून रवा भाजून घ्या. गुलाबी रंग आला की, पपईच्या रसात घालून भिजवून ठेवा. गूळ किंवा साखर घाला. वेलची पूड घाला. १/२ वाटी पाणी घाला. व्यवस्थित ढवळून तासभर ठेवून द्या. सांदण करण्यासाठी, थाळ्याला तुपाचा हात लावून त्यात मिश्रण ओता आणि वाफवून घ्या. किंवा मोदक पात्रात उकडून घ्या. १५ – २० मिनिटे लागतील. वड्या पाडून घ्या. सांदण गरम किंवा गार कशीही चांगली लागतात. पपई मुळे सुंदर रंग येतो. वरून साजूक तूप घालून सर्व्ह करा.