साहित्य : नाचणी पीठ २ वाट्या, आलू बुखारचा पल्प १/२ वाटी, पेअर चा पल्प १/२ वाटी, अननसाचा पल्प १/२ वाटी, सफरचंदाचा पल्प १/२ वाटी, साखर दीड वाटी, दालचिनी पावडर २ चमचे, तूप ४ चमचे.

कृती : एका पॅनमध्ये १ चमचा तूप घालून आलु बुखारचा पल्प घाला. थोडं ढवळून पेअरचा पल्प घाला. अननसाचा आणि सफरचंदाचा पल्प ही घाला. मिश्रण निम्मं होई पर्यंत आटवून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये ३ चमचे तूप घालून नाचणीचे पीठ घाला. खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्या. फळांचा पल्प घाला. ढवळून घ्या. १/२ वाटी पाणी घालून शिजवून घ्या. साखर घाला. २ मिनिटं परतून गॅसवरून उतरवा. गार करून घ्या. मळून घ्या. अॅल्युमिनिअम फॉईलमध्ये ठेवून रोल करून घ्या. १ तास फ्रीज मध्ये ठेवून, बाहेर काढून रोल कापून घ्या खिरापत म्हणून वाटा.

सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ