28 January 2020

News Flash

Ganesh Utsav Recipes 2017 : नारळाच्या दुधातील शेवया

कोकणात प्रसादासाठी हा पदार्थ आवर्जून तयार करण्यात येतो

'शिरवाळ्या' या नावाने देखील हा पदार्थ ओळखला जातो.

साहित्य : तांदळाचं पीठ (दोन मोठ्या वाट्या), नारळाचे दूध, गुळ, वेलची पावडर, चिमुटभर हळद, चवीपुरते मीठ, एक मोठा चमचा तेल

कृती : तांदळाच्या पीठात चवीनुसार मीठ टाकून उकड काढून घ्यावी. तांदळाच्या पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यावे. गॅसवर एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळू लागले की त्यात एक मोठा चमचा तेल टाकावे. या पाण्यात पीठाचे गोळे टाकून ते उकडून घ्यावे. शेव गाळण्याच्या भांड्याला आतून थोडसं तेल लावावं, जेणेकरून पीठ भांड्याला चिकटणार नाही. उकळत्या पाण्यातून लगेच पीठाचे गोळे काढून त्याची शेव गाळून घ्यावी.

नारळाच्या दुधात गुळ बारीक करून मिक्स करून घ्यावा. दुधात रंगासाठी चिमुटभर हळद टाकावी आणि मग वेलची पावडर मिक्स करून घ्यावी. सर्व्ह करताना गुळ मिक्स केलेले नारळाचे दूध एका बाऊलमध्ये काढून घ्यावे आणि त्यात शेवया घालाव्या. कोकणातील हा पारंपारिक गोड पदार्थ आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक घरात प्रसादासाठी हा पदार्थ आवर्जून तयार केला जातोच. ‘शिरवाळ्या’ या नावाने देखील हा पदार्थ ओळखला जातो. अनेक घरात तांदळाची शेव गाळण्यासाठी लाकडाचे वेगळे भांडे देखील तयार करून घेतले जाते.

First Published on September 4, 2017 10:05 am

Web Title: ganesh utshav special 2017 traditional konkani healthy recipe sweet dish
Next Stories
1 गणेश विसर्जन मिरवणुकीसाठीच्या भव्य रथांची तयारी अंतिम टप्प्यात
2 Ganesh Utsav 2017 : आमचा लाडोबा गणपती- उषा नाडकर्णी
3 Ganesh Utsav Recipes 2017 : केळीचे मोदक
Just Now!
X