साहित्य :

बेसन – दोन वाटय़ा, लसूण – सात ते आठ पाकळ्या, हिरव्या मिरच्या – चार ते सहा, जिरे – दोन चमचे, हिंग, हळद – प्रत्येकी अर्धा चमचा, ओलं खोबरं, कोथिंबीर – गरजेनुसार, जिरे, मोहरी – फोडणीसाठी, तेल – पाव वाटी, मीठ – चवीनुसार

कृती :

लसूण, जिरे, हिरव्या मिरच्या वाटून घ्या. जाड बुडाच्या भांडय़ात तेल तापवा. त्यात जिरे, मोहरी हिंग, हळद, वाटलेलं मिश्रण घाला. परतून घ्या. पाणी घाला. मीठ घाला. उकळी आल्यावर त्यात बेसनची पेस्ट घालून छान एकत्र करा. घट्ट होऊ द्या. झाकून वाफ आल्यावर मिश्रण काढून तेल लावलेल्या पाटावर घ्या. थापून एकसारखे करा. त्यावर खोबरं, कोथिंबीर दाबून लावा. गार झाल्यावर वडय़ा कापून घ्या.हा महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ आहे. बऱ्याच सणांना केला जातो.

मंजिरी कपडेकर – response.lokprabha@expressindia.com

सौजन्य – लोकप्रभा