धूम्रवर्ण रथ, गणेश रथ अशा भव्य-दिव्य रथांमधून लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्याची तयारी सुरू झाली आहे. गणेश विसर्जनासाठी रथांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून कार्यकर्त्यांना आता मंगळवारी (५ सप्टेंबर) होत असलेल्या विसर्जन मिरवणुकीचे वेध लागले आहेत.

गणरायाचे आगमन झाले त्याला रविवारी दहा दिवस झाले. गेल्या दहा दिवसांपासून मंगलमय वातावरणात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता वैभवशाली मिरवणुकीने करण्याचे कार्यकर्त्यांना वेध लागले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने यंदा जोरदार मिरवणुका काढून गणरायाला भावपूर्ण निरोप देण्याच्या तयारीमध्ये कार्यकर्ते गुंतले आहेत. गणेश विसर्जनासाठी भव्य-दिव्य रथ साकारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गणेशभक्तांना आनंद देणारी ढोल-ताशा पथके आणि सुमधूर गीतांच्या सुरावटींनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी बँडपथके यांना मिरवणुकीसाठी वेळेवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये सोमवारी (४ सप्टेंबर) सत्यनारायणाची महापूजा होत आहेत. पूजेला बसणारे यजमान आणि गुरुजींनी निमंत्रण देण्याबरोबरच पूजा साहित्याची खरेदी करण्याची लगबग सुरू होती.

Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा
Loksatta Lokrang Where did these insults on Holi originate and how did they develop
निमित्त: शिव्या-महापुराण

गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती धूम्रवर्ण रथामध्ये विराजमान होऊन विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. प्रत्येकी १५ फूट लांबी आणि रुंदी तर २२ फूट उंचीच्या धूम्रवर्ण रथावर ८ खांब असून आकर्षक नक्षीकाम असलेल्या ४ कमानी आहेत. कोरीवकाम असलेले पाच कळस असून हे कळस रंगीत रोषणाईमध्ये उजळून निघणार आहेत. संपूर्ण रथावर ३६ आकर्षक झुंबर लावण्यात आली आहेत. प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी हा रथ साकारला आहे. सुनील प्रजापती यांनी रथाचे रंगकाम केले असून मारणे इलेक्ट्रिकल्स आणि वाईकर बंधू यांनी अवघ्या १५ दिवसांत रथाची विद्युत रोषणाई केली आहे.

सुमारे ३२ फूट उंचीच्या जगदंबा रथामध्ये अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची मूर्ती विराजमान होणार आहे. यामध्ये तुळजा भवानी मातेची मूर्ती आणि दोन दीपमाळा असतील.

हुतात्मा बाबू गेनू मंडळाने भुवनेश्वर येथील गणेश मंदिराच्या प्रतिकृतीवर आधारित गणेश रथ साकारला आहे. २६ फूट उंच, २४ फूट लांब आणि १६ फूट रुंदीच्या या गणेश रथामध्ये गणरायाची मूर्ती विराजमान होणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आमटे, डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. विकास आमटे यांच्या कार्याला अभिवादन करणारा ‘माणूस माझे नाव’ हा रथ वीर हनुमान मित्र मंडळाने साकारला आहे. तर, कस्तुरे चौक मित्र मंडळाचा गणपती भारताच्या झेंडय़ाचा प्रवास उलगडणाऱ्या राष्ट्रगौरव रथामध्ये विराजमान असेल. हे दोन्ही रथ युवा कलाकार क्षितिज रणधीर याने साकारले आहेत.