साहित्य : सारणासाठी – सुकं अंजीर- २०० ग्रॅम, सुकं खोबरं- अर्धी वाटी, पातळ पोहे- अर्धी वाटी, पिठी साखर- अर्धी वाटी, वेलदोडे पूड २ चमचे.

पारीसाठी- गव्हाचं पीठ- १ वाटी, मैदा- १ वाटी, तेल- १ मोठा चमचा, साजूक तूप- ३ चमचे.

कृती : सुकं खोबरं किसून, भाजून हाताने चुरून घ्या. सुकं अंजीर मिक्सरमध्ये वाटून घ्या. पातळ पोहे, १/२ चमचा तुपावर परतून घ्या. मिक्सरमध्ये पोह्यांची पूड करून घ्या. अंजीर, खोबरं, पोहे, पिठी साखर, वेलची पूड एकत्र करून सारण तयार करून घ्या. कणिक व मैदा, तेलाचं मोहन घालून भिजवून घ्या. अर्धा तास झाकून ठेवा. कणकेचे २० गोळे करा. एकेका गोळ्याची वाटी तयार करून त्यात २-२ चमचे सारण भरून घ्या. जाडसर साटोरी लाटून घ्या. मध्यम तापलेल्या नॉनस्टीक तव्यावर साटोऱ्या भाजून घ्या. एक बाजू भाजून झाली की उलटून थोडं तूप घालून दुसरी बाजू भाजून घ्या. अंजिराच्या साटोऱ्या तयार !

सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ