News Flash

Ganesh Utsav 2018 : सुरणाचे मोदक

थोडे हटके मोदक करुन तर पाहा

सुरणाचे मोदक

साहित्य : दोन वाटय़ा सुरणाचा किस

पाव कप तूप

मीठ

पाऊण वाटी साखर

दोन वाटय़ा तांदळाची पिठी

कृती :

सुरणाचे साल काढून किसून घ्या. नंतर तुपावर किस परतवून वर पाण्याचे झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्या. किस चांगला शिजल्यावर त्यात साखर घाला व तो व्यवस्थित परतवून घ्या. नंतर दोन वाटय़ा पाणी उकळण्यास ठेवून त्यात चवीपुरते मीठ व तूप घाला. उकळी आल्यावर तांदळाचे पीठ घालून ढवळून वाफ आणून घ्या. उकड चांगली मळून मोदकाप्रमाणे सारण भरा. आवडत असल्यास सुकामेवा आणि वेलची पूड घालू शकता.

 

प्रिया निकुम

सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 6:42 pm

Web Title: ganpati special recipe suran modak
Next Stories
1 प्रश्न तुमचे उत्तर पंचांगकर्त्यांचे : घरगुती गणेशाची मूर्ती किती उंच असावी?
2 प्रश्न तुमचे उत्तर पंचांगकर्त्यांचे : २१ दुर्वांची जुडीच का?
3 ‘इंद्रवदन’चा शतकमहोत्सवी गणपती
Just Now!
X