15 January 2021

News Flash

मुंबईतील ‘हा’ गणपती सजतो ७० किलो सोन्याने

मुंबईतील जुने आणि शिस्तप्रिय म्हणून मंडळाची ओळख

सौजन्य - एएनआय

महाराष्ट्रातच नाही तर देशभरात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी ढोल-ताशाच्या गजरात गणरायाचे आगमन झाले आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला सजविण्यासाठी फुलांबरोबरच अनेक जण दागिन्यांचाही वापर करतात. यामध्ये इमिटेशन ज्वेलरीपासून सोने आणि चांदीच्या दागिन्यांनाही विशेष महत्त्व असते. घरगुती गणपतीला दागिन्यांनी सजविण्याबरोबरच मोठमोठ्या मंडळाच्या गणपतींनाही दागिने घातले जातात. मुंबईच्या सायन येथील जीएसबी सेवा मंडळाचा गणपती या दागिन्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या गणपतीला यंदा ७० किलो सोन्याचे दागिने घालण्यात आले आहेत.

हे सोन २३ कॅरेटचे असून गणपतीचे १० दिवस हे दागिने बाप्पाच्या मूर्तीवर चढवले जातात. इतके सोने असल्यामुळे मंडळाने विशेष सुरक्षा पथक तैनात केले आहे. सुरक्षा जवानांबरोबरच यंदा सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. या ड्रोनच्या माध्यमातून गणेश मंडपाच्या प्रत्येक कोपऱ्यात नजर ठेवली जाणार आहे. यंदा मंडळाने ग्वाल्हेर येथील सूर्यमंदिराची प्रतिकृती केली आहे. याबरोबरच जीएसबी मंडळ शिस्त आणि येथील उत्तम व्यवस्थेसाठीही प्रसिद्ध आहे. पाचव्या दिवशी या गणपतीचे मोठ्या उत्साहात आणि अतिशय शिस्तबद्धपणे विसर्जन केले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 1:10 pm

Web Title: sion gsb ganpati idol decorated with 70 kg gold of 23 caret attraction of people security
Next Stories
1 पारशी कुटुंबीयांकडून  श्री गणेशाची प्रतिष्ठापना
2 Loksatta.Com वर असा अपलोड करा तुमच्या घरच्या बाप्पाचा फोटो
3 Ganesh Utsav 2018 : ‘घाडगे & सून’, ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेतील कलाकारांचा गणेशोत्सव
Just Now!
X