News Flash

Video : तयारी गणेशोत्सवाची! शहरात घुमतोय ढोल ताशांचा आवाज

गणेश मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाच्या बरोबरीने ढोल-ताशांच्या ढणढणाटाचा स्वर टीपेला पोहोचणार आहे.

गणपतीच्या आगमनाला आता अवघे काही दिवस उरले असून गणेशमंडळांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे. आता ढोल- ताशा पथकांच्या गगनभेदी आवाजात मिरवणूक काढण्याची पद्धत पुण्यापाठोपाठ मुंबईतही रुढ होत आहे. मुंबईतही ढोल-ताशा पथकांची संख्या वाढू लागली असून आता मुंबईतील गणेश मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाच्या बरोबरीने ढोल-ताशांच्या ढणढणाटाचा स्वर टीपेला पोहोचणार आहे.

डोंबिवलीतील ‘व्योम’ ढोल- ताशा पथक गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी करत आहे. शिस्तबद्ध आणि लयबद्ध मिरवणूक हे या ढोल पथकाचे खास वैशिष्ट्य. या ढोल-ताशा पथकात ४० ते ५० ते सदस्य आहेत. हौस म्हणून आणि परंपरेची जपणूक, जतन आणि संवर्धन याला चालना मिळावी म्हणून ते पथकात सहभागी होतात.

चला तर मग पाहूयात या ढोल- ताशा पथकाची जय्यत तयारी..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 2:27 pm

Web Title: vyom dhol tasha pathak dombivli dhol tasha in ganpati festival ganeshotsav 2018
Next Stories
1 ‘मुंबईचा राजा’ बनण्याची संधी!
2 ..तरीही ‘पीओपी’ मूर्तीना अधिक मागणी
3 मूर्तीपासून मोदकापर्यंत सर्वच ऑनलाइन
Just Now!
X