अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत आकर्षण असणारा सर्वांचा लाडका ‘गणपती बाप्पा’वर प्रथमच वेब सीरीज आली आहे. गणपती बाप्पाची कथा आणि काळानुसार बाप्पाच्या उत्सवाचे बदलते स्वरूप, इतिहास, सखोलपणे माहिती या वेब सीरीजमध्ये मांडण्यात आली आहे. पुण्यातील नामवंत संकल्प डिझाइन्सने या वेब सीरीजच्या माध्यमातून वेब विश्वात पदार्पण केले आहे.

गेल्या सात वर्षांपासून http://www.puneganeshfestival.com च्या माध्यमातून पुण्यातील गणपती उत्सवाविषयक प्रत्येक माहिती, अपडेट, छायाचित्रे – चलचित्रे आणि रंजक माहिती संकल्प संस्थेने सातत्याने दिले आहे. पुण्यातील व महाराष्ट्रातील गणेश उत्सव, त्याची महती, उत्सवाची परंपरा हा सातासमुद्रापार पोहचावा हाच त्याचा उद्देश आहे. ‘पुणेरी बाप्पा’ असे या वेब सीरिजचे नाव आहे. इको फ्रेंडली बाप्पा, १२५ वर्षांपासूनचा गणेश उत्सव, कालानुरूप गणेश उत्सवात कसा बदल होत गेला, गणपती स्थापनेचा इतिहास असे अनेक बारकावे यातून प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहे.

युट्यूबवरील ‘पुणे गणेश फेस्टिव्हल’ या चॅनेवर ही वेब सीरिज पाहायला मिळेल.