News Flash

नवसाचा गणपती? जाहिरातदार मंडळांवर विघ्न

‘नवसाला पावणारा गणपती’ अशी जाहिरात करणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कायद्याच्या कचाटय़ात सापडण्याची शक्यता आहे. सध्याच्या ‘जादूटोणा विरोधी कायदा-२०१३’ नुसार अशा प्रकारे जाहिरात करणे हा गुन्हा

| August 29, 2014 01:06 am

‘नवसाला पावणारा गणपती’ अशी जाहिरात करणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कायद्याच्या कचाटय़ात सापडण्याची शक्यता आहे. सध्याच्या ‘जादूटोणा विरोधी कायदा-२०१३’ नुसार अशा प्रकारे जाहिरात करणे हा गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे अशी जाहिरात करणाऱ्या गणेशोत्सव मंडळाच्या विरोधात कोणी तक्रार केली तर ही मंडळे कायद्याच्या कचाटय़ात सापडू शकतात.
जादूटोणा विरोधी कायदा-२०१३ नुसार अंधश्रद्धेचा प्रसार करून त्यापासून आर्थिक प्राप्ती करणे या कायद्याने गुन्हा ठरविले आहे. अशा प्रकारे जाहिरात करून काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे भक्तांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेतात. भाविकांचा ओघ आपल्या मंडळाकडे खेचून घेण्याच्या या प्रयत्नातून या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडे भाविकांचीही मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाचे व्यापारीकरण झालेले पाहायला मिळत आहे.
‘नवसाला पावणारा गणपती’अशी जाहिरात केल्यामुळे मंडपात भाविकांची प्रचंड गर्दीतर होतेच पण या गर्दीचे नियंत्रण करतानाही अडचणी येतात. यातून कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही यातून स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र काही मंडळांमध्ये पाहायला मिळाले आहे. ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी जाहिरात केल्यामुळे ‘अर्थ’व्यवहारातही वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्य शासनाने नुकताच जादूटोणा विरोधी कायदा लागू केला असून ‘नवसाला पावणारा गणपती’अशी जाहिरात करणे हा या कायद्याच्या दृष्टीने दखलपात्र गुन्हा ठरू शकतो. कारण यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळू शकते. नवसाला पावणारा गणपती, अशी निधीसंकलनाच्या हव्यासापोटी केल्या जाणाऱ्या जाहिरातीतून आर्थिक प्राप्ती करणे हा गुन्हा आहे. राज्य शासनाने योग्य पावले उचलून कारवाई करण्याची अपेक्षा हिंदू जनजागृती समितीने व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:06 am

Web Title: advertising restriction imposed on ganesh mandal
Next Stories
1 श्रींच्या स्वागताचा सर्वत्र अपूर्व उत्साह
2 गणेश मंडळांच्या देणग्यांना आचारसंहितेचा धसका
3 पेन्टिंग ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस; गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप
Just Now!
X