News Flash

पर्यावरणस्नेही गणेशोत्सवासाठी ‘इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’

गणेशोत्सवाची मूर्ती असो की सजावटीचे साहित्य..प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोलसारख्या वस्तूंच्या वापरामुळे प्रदूषण वाढू लागल्याने गेल्या काही काळापासून पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची कल्पना लोकांमध्ये रुजत आहे.

| August 29, 2014 01:11 am

गणेशोत्सवाची मूर्ती असो की सजावटीचे साहित्य..प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोलसारख्या वस्तूंच्या वापरामुळे प्रदूषण वाढू लागल्याने गेल्या काही काळापासून पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची कल्पना लोकांमध्ये रुजत आहे. वेगवेगळय़ा कल्पना लढवून लोक पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशा साहित्याचा वापर करून घरगुती गणेशोत्सव साजरा करत आहेत. पर्यावरण रक्षणाच्या या लोकचळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘लोकसत्ता’ यांच्यातर्फे यावर्षीही ‘इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
या ‘इको फेंड्रली गणेशोत्सव स्पर्धा २०१४’साठी ‘केसरी’ आणि ‘जनकल्याण सहकारी बँक लि.’ हे सह प्रायोजक आहेत. तर ‘रिजन्सी ग्रुप’ आणि ‘चितळे डेअरी’ यांची समर्थ साथ या स्पर्धेला आहे. पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर करून गणरायाची आरास करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. त्यासाठी सजावटीचे छायाचित्र काढून पाठवायचे आहे. ही स्पर्धा मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर विभागात घेण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक ९९९९ रुपयांचे आहे. तर द्वितीय पारितोषिक ६६६६ रुपयांचे आहे. तर विशेष पारितोषिक २००१ रुपयांचे आहे. रोख रकमेबरोबरच विजेत्या मानचिन्ह आणि प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत दीड ते अकरा दिवसांपर्यंत घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत भाग घेता येईल. स्पर्धेसाठी ‘पाच बाय सात’ आकाराची तीन रंगीत छायाचित्रे ‘लोकसत्ता’च्या विभागीय कार्यालयांमध्ये ५ सप्टेंबपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्वीकारली जातील. छायाचित्र व माहिती टपालाने, कुरियरच्या माध्यमातून किंवा ecoganesha@gmail.com   या ई-मेलवर पाठवता येईल. मुदतीनंतर आलेल्या छायाचित्रांचा विचार स्पर्धेसाठी केला जाणार नाही. उशिरा मिळालेल्या छायाचित्रांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही. गणेशमूर्ती व सजावट पर्यावरणस्नेही असावी. प्लास्टिक, थर्माकोलचा वापर नसावा. छायाचित्रात गणेशमूर्ती, मखर आणि सजावट स्पष्ट दिसावी. छायाचित्रे तिन्ही बाजूने वेगवेगळी घ्यावीत. प्रत्येक छायाचित्रांच्या सोबत स्पर्धकाचे नाव, घरचा पत्ता, दूरध्वनी, मोबाइल, ई-मेल, सजावटीसाठी वापरलेल्या साहित्याची यादी जोडावी. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

अधिक माहितीसाठी संपर्क
* मुंबई – लोकसत्ता, ब्रॅण्ड मार्केटिंग, एक्स्प्रेस टॉवर्स, दुसरा मजला, नरिमन पॉइंट, दूरध्वनी-६७४४०३६९.
* ठाणे – अजयकुमार चुघ, लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रस्ता, नौपाडा.
* नाशिक – वंदन चंद्रात्रे, लोकसत्ता, ६ स्टेडियम कॉम्प्लेक्स, महात्मा गांधी रोड.
* पुणे – रोहित कुलकर्णी, दि इंडियन एक्स्प्रेस लि., एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट क्रमांक १२०५/२/६, शिरोळे रोड, शिवाजी नगर, दूरध्वनी – ०२०/६७२४१०००.
* औरंगाबाद – मुकुंद कानेटकर, लोकसत्ता, मालपानी ओबेरॉय टॉवर्स, पहिला मजला, गव्हर्न्मेंट मिल्स स्कीमसमोर, जालना रोड, दूरध्वनी – ०२४०/२३४६३०३.
* अहमदनगर – संतोष बडवे, वितरण विभाग, लोकसत्ता, आशीष सथ्था कॉलनी स्टेशन रोड, दूरध्वनी – २४५१९०७/२४५१५४४.
* नागपूर – ज्ञानेश्वर महाले – वितरण विभाग, लोकसत्ता, १९ ग्रेट नाग रोड, दूरध्वनी – ०७१२/२७०६९२३/२७०६९९७.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:11 am

Web Title: eco friendly household ganesh decoration competition for eco environmental lovers
Next Stories
1 सोलापुरात गणरायाच्या स्वागताची तयारी
2 गणपतीला फक्त मोदकच प्रिय नाहीत..
3 नवसाचा गणपती? जाहिरातदार मंडळांवर विघ्न
Just Now!
X