पुणे, नाशिक आणि मुंबईच्या गणेशोत्सवाचे ‘अपडेट्स’ आणि गणपतीसंबंधीची माहिती देणारे एक नवीन संकेतस्थळ सुरू झाले आहे. या संकेतस्थळावर गणपती मंडळांचे तसेच घरगुती गणपतींची छायाचित्रे आणि व्हिडिओही अपलोड करता येणार आहेत.
‘ओएमसीव्ही सव्र्हिसेस’ या कंपनीने www.ganpatimandal.com या संकेतस्थळाचे शुक्रवारी उद्घाटन केले. तसेच या संकेतस्थळाचे फेसबुक पानही सुरू करण्यात आले. या संकेतस्थळाचे प्रतिनिधी पुणे, नाशिक आणि मुंबईच्या गणेशोत्सवाची क्षणचित्रे टिपून त्याचे अपडेट्स संकेतस्थळावर व फेसबुक पानावर अपलोड करणार आहेत. गणपती मंडळांना तसेच घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांना आपल्या गणपतीचे स्वतंत्र पानही या संकेतस्थळावर तयार करता येणार आहे. ही सेवा सशुल्क असल्याचे कंपनीच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी राहुल पवार यांनी सांगितले.