जल्लोष वाढविणारा ढोल-ताशांचा निनाद.. मधुर सुरावटींनी आकर्षित करणारे बँडपथकांचे बहारदार वादन.. ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर.. कार्यकर्ते आणि ढोल-ताशा पथकातील युवक-युवतींमध्ये संचारलेला सळसळता उत्साह.. ठिकठिकाणी सुरू असलेल्या छोटेखानी मिरवणुका.. अशा पुलकित करणाऱ्या वातावरणात ‘विघ्नहर्ता’ गणराय शुक्रवारी वाजत गाजत आले. मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी  मुहूर्तावरच ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली. गणरायाची प्रतिष्ठापना होईपर्यंत प्रतीक्षा केलेल्या वरुणराजानेही आपला आनंद व्यक्त करीत बरसण्याची कृपा केली. ढोल-ताशांचा निनाद, मिरवणुका, विधिवत पूजेने होणारी प्रतिष्ठापना आणि समूह स्वरांत केली जाणारी आरती हे मन प्रसन्न करणारे वातावरण पुणेकरांनी अनुभवले.
गणेशोत्सव सोहळ्याला शुक्रवारी ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेने आरंभ झाला. सकल कलांचा अधिपती आणि गणांचा नायक असलेल्या गणरायाची घरोघरी षोडशोपचार पूजेने प्रतिष्ठापना झाली. सूर्योदयानंतर घरच्या गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यावर कार्यकर्ते गणेश मंडळांच्या मिरवणुकांसाठी सज्ज झाले. पूजा सांगणाऱ्या गुरुजींनी वेळ गाठण्याची कसरत यशस्वीपणे सांभाळली. तर, ढोल-ताशा पथकांमधील युवक-युवती आणि बँडपथकांतील कलाकार सकाळपासूनच तयार होते. बहुतांश गणेश मंडळांनी गुरुजींकडून मुहूर्त काढून घेतला आणि त्यानुसार गणरायाची प्रतिष्ठापना केली. गणरायाच्या प्रसादासाठी माव्याचे, उकडीचे, चॉकलेटचे, सुकामेव्याचे असे विविध प्रकारचे मोदक आणि साखरफुटाणे खरेदी करण्याबरोबरच पूजासाहित्य खरेदीसाठी मंडई परिसर सकाळपासूनच गजबजून गेला होता. दूर्वा, केवडय़ाचे पान, कमळ, शमी, तुळस, पत्री, विविध गंधांची फुले याबरोबरच अन्य पूजा साहित्याची बाजारपेठ गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती.
कसब्याची पारंपरिक मिरवणूक
पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक निघाली. उत्सव मंडपापासून सकाळी ९ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. देवळाणकर बंधू यांचा सनईवादनाचा गाडा अग्रभागी होता. प्रभात बँडपथक, समर्थ प्रतिष्ठानचे ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. जिजामाता उद्यान, बुधवार चौक, अप्पा बळवंत चौक, लोखंडे तालीम चौक, हमालवाडा येथून मूर्तिकार नीलेश पार्सेकर यांच्याकडून मूर्ती घेऊन मिरवणूक उत्सव मंडपात आली. डॉ. सुनील काळे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून १६ मिनिटांनी श्रींची प्रतिष्ठापना झाली. महापौर चंचला कोद्रे या वेळी उपस्थित होत्या.
जोगेश्वरीची मूर्ती रथामध्ये
ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दुसऱ्या गणपतीची मिरवणूक उत्सव मंडपापासून सकाळी सव्वादहा वाजता चांदीच्या रथातून निघाली. अप्पा बळवंत चौक, लोखंडे तालीम चौक, कुंटे चौक, लिंबराज महाराज चौक आणि गणपती चौक या मार्गाने मिरवणूक मंडपामध्ये आली. सतीश आढाव यांचा नगारावादनाचा गाडा अग्रभागी होता. शिवमुद्रा ढोल-ताशा पथक आणि न्यू गंधर्व बँडपथक मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. दुपारी साडेबारा वाजता ‘भाग्यश्री ट्रॅव्हल्स’चे विवेक गोळे आणि ऐश्वर्या गोळे यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली.
गुरुजी तालमीला फुलांचा रथ
सुभाष सरपाले यांनी सजविलेल्या आकर्षक फुलांच्या रथातून श्री गुरुजी तालीम मंडळ या मानाच्या तिसऱ्या गणपतीची मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता मंदिरापासून निघाली. नगरकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा अग्रभागी होता. वेगवेगळे ताल वाजविणारी शिवगर्जना, नादब्रह्म, चेतक स्पोर्ट्स ही तीन ढोल-ताशा पथके सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. गणपती चौक, िलबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी मंदिर चौक या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपात आली. उद्योजक मनोज छाजेड आणि डॉ. प्रीती छाजेड यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
महागणपतीची प्रतिष्ठापना
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मानाच्या चौथ्या गणपतीची प्रतिष्ठापना कर्नल (निवृत्त) संभाजी पाटील यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता झाली. त्यापूर्वी मंडईतील टिळक पुतळा येथून सकाळी मिरवणुकीला प्रारंभ झाला. शनिपार चौक, िलबराज महाराज चौक, गणपती चौक या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपामध्ये आली. शिवमुद्रा गजलक्ष्मी, शौर्य, वज्र ही ढोल-ताशा पथके मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. गणरायासाठी केलेला चांदीचा हार प्रतिष्ठापनेनंतर श्रींना अर्पण करण्यात आला.
केसरीवाडय़ाचा गणपती पालखीतून
पारंपरिक पालखीतून केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टची मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता निघाली. रमणबाग प्रशाला येथील मूर्तिकार गोखले यांच्याकडून मूर्ती घेऊन निघालेली ही मिरवणूक उत्सव मंडपामध्ये आली. बिडवे बंधू यांचे नगारावादन आणि श्रीराम ढोल-ताशा पथक मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. केसरी-मराठा ट्रस्टचे विश्वस्त रोहित टिळक आणि प्रणती टिळक यांच्या हस्ते सकाळी साडेअकरा वाजता श्रींची प्रतिष्ठापना झाली.
भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट
‘हिंदूुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती’ असा लौकिक असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची प्रतिष्ठापना खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता झाली. त्यापूर्वी मंदिरापासून लाकडी रथातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. बुधवार चौक, जोगेश्वरी चौक, अप्पा बळवंत चौक, अण्णासाहेब पटवर्धन चौक मार्गे मिरवणूक उत्सव मंडपामध्ये आली. शिववर्धन, ब्रह्मचैतन्य, रुद्र, वाद्यवृंद आणि श्रीराम पथक ही पाच ढोल-ताशा पथके मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. महापौर चंचला कोद्रे आणि उपमहापौर बंडू गायकवाड यांनी रथाचे सारथ्य केले.
अखिल मंडई मंडळ
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. हर्षद िनबाळकर आणि मीरा निंबाळकर यांच्या हस्ते अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची प्रतिष्ठापना दुपारी साडेबारा वाजता झाली. त्यापूर्वी तात्या थोरात समाज मंदिर, हुतात्मा बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक, गोटीराम भय्या चौक या मार्गाने निघालेली मिरवणूक उत्सव मंडपामध्ये आली. रणवाद्य आणि नूमविय ही दोन ढोल-ताशा पथके मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती.
दगडूशेठचा गणपती रथात
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची मिरवणूक मंदिरापासून सकाळी आठ वाजता सुरू झाली. प्रभात, दरबार ही बँडपथके आणि मुळशी तालुक्यातील ढोल-ताशा पथके मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा, हुतात्मा बाबू गेनू चौक या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपामध्ये आल्यानंतर अॅड. विष्णूमहाराज पारनेरकर यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील, माजी आमदार उल्हास पवार आणि उल्हास काळोखे या वेळी उपस्थित होते. प्रतिष्ठापना झाल्यावर श्रीफळाचे तोरण गणरायाच्या चरणी अर्पण करण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. विवेक खटावकर यांनी साकारलेल्या कैलास मंदिराच्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंह यांच्या हस्ते सायंकाळी झाले.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Police dressed as priests in Uttar Pradesh
अन्वयार्थ : पोलीस पुजारी.. की पुजारी पोलीस!
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष