गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना औंध येथील डीपी रस्त्यावर रविवारी रात्री घडली. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकास अटक केली आहे.
संतोष विठ्ठल गायकवाड (वय २५, रा. विधाते वस्ती, बाणेर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चालक गोकुळ मच्िंछद्र मिसाळ (वय ३५) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध, बाणेर परिसरातील गणपती विसर्जन मिरवणूक रविवारी रात्री होती. गायकवाड हा ट्रॅक्टर व ट्रेलरच्या मध्ये बसला होता. औंध येथील डीपी रस्त्यावरील शिवसागर हॉटेलसमोर विसर्जन मिरवणूक आली असता गायकवाड हा अचानक खाली पडला. त्याच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वाळेकर करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 17, 2013 2:37 am