संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आपल्या लाडक्या बाप्पासाठी लोक तऱ्हेतऱ्हेचे पक्वान्न बनवत आहेत आणि त्याला दररोज वेगवेगळा नैवेद्यही दाखवण्यात आहे. मिठाईच्या दुकानातही स्वादिष्ट मिठाईंची चंगळ पाहायला मिळत आहे. मात्र आग्रा येथील एका गणेशभक्त मिठाईवाल्याने २४ कॅरेटचा सोन्याचा मोदक तयार केला आहे. हा मोदक तयार करण्यासाठी त्याने बाप्पाला आवडणाऱ्या सर्व पदार्थांसह सोन्याचाही वापर केला आहे. दरम्यान, हा मोदक सध्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आग्रा येथील शाह मार्केटमधील ब्रिज रसायनम स्वीट्स भंडारने सोन्याचे मोदक बनवले आहेत. या लाडूवर २४ कॅरेट सोन्याचे वर्ख लावण्यात आले आहे. या अनोख्या मोदकांमध्ये मध, सुकी कोथिंबीर, बत्तासे, ड्रायफ्रुट्स, बुंदी यांचा वापर करण्यात आला आहे. त्यानंतर या मोदकावर सोन्याचे वर्ख लावण्यात आले आहे.

Photos : गेल्या ८८ वर्षांत असे बदलले ‘लालबागचा राजा’चे रूप; पाहा फोटो

ब्रिज रसायनम स्वीट्स भंडारचे मालक तुषार यांनी सांगितले की सणासुदीच्या काळात लोकांना काहीतरी नवीन द्यावं हा यामागचा हेतू आहे. याच उद्देशाने त्यांनी याआधी दिवाळीला सोन्याची मिठाई आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने सोन्याचे घेवर तयार केले होते. या मिठाईंना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांनी २४ कॅरेट सोन्याचा वर्ख लावलेले मोदक तयार केले आहेत. यासाठी विशेष पॅकिंगही करण्यात आले आहे.

तुषार यांच्या मते, सामान्य मोदक मिठाईच्या प्रत्येक दुकानात मिळतात. मात्र २४ कॅरेट सोन्याचे मोदक केवळ त्यांच्याकडेच मिळतात. या सोन्याच्या एका मोदकाची किंमत ५०० रुपये, तर एक किलो मोदकांची किंमत तब्बल १६ हजार ५०० रुपये आहे.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 carat gold modak made for ganpati bappa you will also be surprised to read the price of one piece pvp
First published on: 02-09-2022 at 10:35 IST