हिंदू धर्मात गणेश चतुर्थीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम गणेशाची पूजा केली जाते. गणपतीची अनेक नावे आहेत. त्याला विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुखहर्ता अशा अनेक नावांनी संबोधले जाते. गणपतीचे शरीर आणि त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट माणसाला नक्कीच काहीतरी धडा देते. आज आपण गणेशाच्या मोठ्या कानामागील रहस्य काय आहे, हे जाणून घेऊया.
श्रीगणेशाच्या लांब कानांमागे एक मोठे कारण दडलेले आहे. हिंदू धर्मानुसार, भगवान गणेशाचे कान सूपसारखे मोठे आहेत, म्हणून त्यांना गजकर्ण आणि सूपकर्ण असेही म्हणतात. असे म्हणतात की श्रीगणेशा सर्वांचे ऐकतो आणि नंतर आपल्या बुद्धीने आणि विवेकाने योग्य निर्णय घेतो. अशा वेळी गणेशाचे मोठे कान आपल्याला ही शिकवण देतात की आपण प्रत्येकाचे ऐकावे, मात्र आपल्या बुद्धीला पटेल तेच करावे. जो माणूस दुसऱ्याच्या बुद्धीला अनुसरून कार्य करतो, तो कधीही यश मिळवू शकत नाही.
गणपती बाप्पासाठी तयार केले २४ कॅरेट सोन्याचे मोदक; एका मोदकाची किंमत वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
गणेशाचे मोठे कान हेदेखील सूचित करतात की आपण नेहमी सतर्क राहिले पाहिजे. गणेशाचे मोठे कान आपल्याला ही शिकवण देतात की ज्या काही वाईट गोष्टी तुमच्या कानापर्यंत पोहोचतील त्या आत्मसात करू नये. वाईट गोष्टी आपल्या मनावर आणि बुद्धीवर बिंबवू नये आणि आपण नेहमी इतरांकडून अशा गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत ज्या आपल्याला चांगली शिकवण देतात.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)