Famous Ganesh Temple Of India : श्रीगणेशाची विविध ठिकाणं विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. त्याची ही सगळी रुपं, त्यांच्यामागच्या आख्यायिका हे आपलं सांस्कृतिक वैभव आहे. आपल्याकडे गणेशाची अनेक क्षेत्रे आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा गणपती मंदिराबाबत सांगणार आहोत, जिथे मुर्ती अनेकवेळा समुद्रात फेकल्यानंतरही ती आपोआप परतून येत होती. आहे की नाही चमत्कार? या गणपती मंदिराबाबत जाणून घेण्याची तुमची उत्सुकता वाढली असेलच. तर तुमची ही उत्सुकता आणखी न वाढवता हे मंदिर नक्की कुठे आहे, जाणून घेऊया…

३५६ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या मंदिरात असलेली गणेशमूर्ती अनेकवेळा समुद्रात फेकून दिल्यानंतरही ती स्वत: तिच्या जागी दिसायची, असं म्हटलं जातं. या मंदिराच्या भिंतींवर श्रीगणेशाच्या जीवनाशी संबंधित देखावे चित्रित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये भक्तांना गणपतीच्या जन्मापासून ते लग्नापर्यंतच्या अनेक कथा चित्रांच्या माध्यमातून जाणून घेता येतील. येथे तुम्ही शास्त्रात सांगितलेली गणपतीची १६ रूपे देखील पाहू शकता.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
young man committed suicide as he did not want to marry
खळबळजनक! लग्न करायचं नसल्याने नवरदेवाने केली आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मामाला…
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
firing at ram mandir ayodhya
अयोध्या : राम मंदिर परिसरात सुरक्षेसाठी तैनात PAC जवान गोळी लागून जखमी, परिस्थिती गंभीर

गणपतीच्या या चमत्कारिक मंदिराचे नाव मनकुला विनयगर मंदिर आहे. हे मंदिर पुद्दुचेरीमध्ये आहे. या मंदिराचे मुख समुद्राकडे आहे. त्यामुळे या मंदिराला भुवनेश्वर गणपती असेही म्हणतात. तमिळमध्ये मनाल म्हणजे वाळू आणि कुलन म्हणजे तलाव. पूर्वी येथील गणेश मूर्तीच्या आजूबाजूला भरपूर वाळू असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मंदिराला मानकुला विनयगर असे नाव पडले. हे मंदिर १६६६ मध्ये बांधले गेले. त्यावेळी पुद्दुचेरी फ्रान्सच्या ताब्यात होते. हे मंदिर सुमारे ८,००० स्क्वेअर फूट परिसरात बांधले गेले आहे.

या मंदिराशी निगडीत एक अनोखी कथा आहे. पुद्दुचेरीमध्ये फ्रेंच राजवटीत या मंदिरावर आक्रमण करण्याचे अनेक प्रयत्न झाले आणि अनेकवेळा मंदिरात बसवलेल्या गणपतीची मूर्ती समुद्रात विसर्जित करण्यात आली, परंतु प्रत्येक वेळी ती पुन्हा आपल्या जागी परतून येत होती, असे म्हटले जाते. मंदिराच्या पूजेत अडथळा आणण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले, मात्र आजही हे गणपतीचे मंदिर अभिमानाने उभे आहे.

मुख्य गणेशमूर्तीशिवाय मंदिरात इतर ५८ गणेशमूर्ती आहेत. या मंदिरात गणेशजींचा १० फूट उंच भव्य रथही आहे. ज्याच्या बांधकामात साडेसात किलो सोने वापरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पुद्दुचेरी फ्रेंच राजवटीत असताना मंदिरावर अनेक हल्ले झाले. येथे स्थापित गणेशमूर्ती अनेकवेळा समुद्रात फेकण्यात आल्या. पण प्रत्येक वेळी मूर्ती जागी दिसणे हा एक चमत्कारच होता.

दरवर्षी विजयादशीच्या दिवशी गणेशजी या रथावर स्वार होतात. मंदिराचा हा विशिष्ट रथ सागवान लाकडाचा असून तो पूर्णपणे ताम्रपटाने झाकलेला आहे. तांब्याच्या या प्लेट्स अतिशय सुंदरपणे कोरल्या गेल्या आहेत. या प्लेट्सही सोन्याने सजवलेल्या आहेत. या रथाच्या उभारणीत साडेसात किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात साजरा केला जाणारा ब्रह्मोत्सवम हा येथील मुख्य सण आहे, जो २४ दिवस चालतो. याशिवाय विनायक चतुर्दशी, गणेश चतुर्थी आणि इतर अनेक सण मंदिरात मानले जातात. यावेळी गणेश चतुर्थी ३१ ऑगस्ट रोजी आहे. अशा परिस्थितीत या गणेश चतुर्थीला तुम्ही कुटुंबासह या मंदिराला भेट देऊ शकता. मंदिराच्या वेळा सकाळी आहेत: पहाटे ५.४५ ते दुपारी १२.३० आणि संध्याकाळी: ४.०० ते रात्री ९.३० पर्यंत असते.

कसे पोहोचायचे?
बंगालच्या उपसागराच्या पश्चिमेस फक्त ४०० मीटर अंतरावर, मनकुला विनयागर मंदिर तामिळनाडूची राजधानी चेन्नईपासून १६५ किमी दक्षिणेस आणि विलुप्पुरमच्या पूर्वेस ३५ किमी अंतरावर आहे. मंदिरापासून जवळचे विमानतळ पुडुचेरी विमानतळ आहे जे येथून सुमारे ६ किमी अंतरावर आहे. पुडुचेरी विमानतळावरून हैदराबाद आणि बंगलोरसाठी उड्डाणे उपलब्ध आहेत. पुद्दुचेरी हे विलुप्पुरम आणि चेन्नईला अनेक नियमित गाड्यांद्वारे रेल्वेने जोडलेले आहे. याशिवाय पुद्दुचेरी भारतातील अनेक शहरांशी रस्ते आणि जलमार्गाने जोडलेले आहे.