हिंदू धर्मातील प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा सणही त्यापैकीच एक. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी घरोघरी शुभ मुहूर्तावर बाप्पाची स्थापना केली जाते. गणेशोत्सव हा दहा दिवसांचा उत्सव आहे. दहा दिवस आपल्या घरात बाप्पा विराजमान होतात आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन होते. यावेळी ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरामध्ये गणपतीची स्थापना केल्याने रिद्धी-सिद्धीची प्राप्त होते. असे मानले जाते की श्रीगणेश लवकर कोपतात, पण त्यांचे मन वळवणेही तितकेच सोपे असते. त्यामुळे गणपतीची पूजा करताना काही गोष्टी काळजीपूर्वक केल्या तर बाप्पा लवकर प्रसन्न होऊ शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार गणपतीला त्याच्या प्रिय वस्तू अर्पण केल्याने लाभ होतो. यातील एक गोष्ट म्हणजे दुर्वा. बाप्पाला दुर्वा खूप प्रिय आहे असे म्हणतात. पण गणपतीला दुर्वा अर्पण करण्याचेही काही नियम आहेत. आज आपण दुर्वा अर्पण करण्याचे नियम जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रानुसार गणपतीची पूजा दुर्वाशिवाय अपूर्ण मानली जाते. तसेच बाप्पाला दुर्वा अर्पण केल्याने तो लवकर प्रसन्न होतो आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतो, असेही सांगितले जाते. दुर्वा नेहमी जोडीने अर्पण केला जाते. अशा वेळी दोन दुर्वा जोडून एक गाठ बांधली जाते. अशा स्थितीत २२ दुर्वा एकत्र करून त्याच्या ११ जोड्या बनवाव्यात. हे शक्य नसेल तर बाप्पाला ३ किंवा ५ गाठी असलेल्या दुर्वा अर्पण कराव्यात.

Ganesh Chaturthi 2022: घरी प्राणप्रतिष्ठापना करताना डाव्या सोंडेच्या गणेशालाच का दिलं जातं प्राधान्य? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

दुर्वा अर्पण करताना खालील मंत्राचा जप करा

शास्त्रानुसार गणेशाला दुर्वा अर्पण करताना मंत्राचा जप करणे उत्तम मानले जाते. मंत्रजप करताना दुर्वा अर्पण केल्यास घरात सुख-समृद्धी नांदते आणि गणपतीची कृपा राहते.

दुर्वा अर्पण करताना म्हणायचे मंत्र

इदं दूर्वादलं ऊं गं गणपतये नमः

ओम् गं गणपतये नमः

ओम् एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्

ओम् श्रीं ह्रीं क्लें ग्लौम गं गणपतये वर वरद सर्वजन जनमय वाशमनये स्वाहा तत्पुरुषाय । विद्महे वक्रतुंडाय धिमहि तन्नो दंति प्रचोदयत ओम शांति शांति शांतिः

ओम् वक्रतुण्डैक दंष्ट्राय क्लीं ह्रीं श्रीं गं गणपते वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा

या गोष्टी लक्षात ठेवा

  • शास्त्रानुसार गणपतीच्या मस्तकावर दुर्वा अर्पण केली जाते.
  • गणपतीला नेहमी मंदिरात किंवा बागेत वाढलेली दुर्वा अर्पण करावी. कुठूनही तोडून आणलेला दुर्वा अर्पण करू नये.
  • ज्या ठिकाणी जमीन घाण आहे किंवा जमिनीत घाण पाणी आहे अशा ठिकाणाहून दुर्वा आणू नका.
  • गणपतीला दुर्वा अर्पण करण्यापूर्वी ते स्वच्छ पाण्यात धुवून घ्या.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi 2022 take special care of these things while offering durva to ganpati along with it chanting this mantra will get benefit pvp
First published on: 27-08-2022 at 13:18 IST