scorecardresearch

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीनिमित्त ‘या’ ५ मंत्रांचा करा जप; गणरायाची राहिल कृपादृष्टी 

Ganesh Chaturthi Shubha Mantra: लाडक्या गणरायाच्या आगमनाने आयुष्यात शांती, समाधान आणण्यासाठी तुम्ही खालील मंत्रांचा जप करु शकता.

Ganesh Chaturthi 2023 chant these 5 mantras during ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीनिमित्त या ५ मंत्रांचा करा जप; गणरायाची राहिल सदैव कृपा (image – pixabay)

Ganesh Chaturthi Shubh Mantras 2023:  लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली जाईल. यानंतर भक्तगण बाप्पाची मनोभावे पूजा करतील. यामुळे गणेशोत्सावाचे ५ ते १० दिवस अतिशय उत्साहाचे, आनंदाचे आणि जल्लोषपूर्ण असतात. गणेशोत्सवात आरती, पूजा विधी यांना विशेष महत्व असते. पूजेच्या दरम्यान गणपती बाप्पाचे आवडते मंत्रोच्चार करणे शुभ मानले जाते. यातून नोकरी, धंद्यात प्रगती, सुख- समृद्धी आणि संकट दूर करण्यासाठी गणरायाकडे साकडं घातले जाते. चतुर्थीच्या दिवशी तुम्ही खालील दिलेल्या मंत्रांचा २१ वेळा जप केल्यास गणपती बाप्पा प्रसन्न होतो असे मानले जाते. पण शक्य नसल्यास तुम्ही दिवासातून एकदा तरी या मंत्रांचा जप आवर्जून करा. पण हे मंत्र जपताना त्याचे उच्चारण नीट करा.

१) गणेश मनोकामना पूर्ती मंत्र

Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य

ॐ गं गणपतये नमः

२) गणपतीला प्रसन्न करण्याचा मंत्र

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

३) गणेश गायत्री मंत्र

ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात्।

गं क्षिप्रप्रसादनाय नम: .

४) विशेष इच्छा पूर्ती मंत्र

ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरु गणेश,

ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, मेरे दूर करो क्लेश.

५) दीर्घायुष्य मंत्र

नारद उवाच, प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्,

भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थ सिद्धये.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ganesh chaturthi 2023 chant these 5 mantras during ganesh chaturthi sjr

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×