scorecardresearch

Premium

Video : येई हो विठ्ठले माझे…; एसटीतील घंटीच्या नादावर ताला-सुरात गायली गणरायाची आरती

Ganpati Aarti Viral Video: गणरायाच्या आरती म्हणण्याच्या हटके पद्धतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Ganesh Chaturthi 2023 Ganpati bappas ye o vitthale majhe mauli ye aarti sung in rhythm to the sound of bells in ST bus video viral
Video : येई हो विठ्ठले…; एसटीच्या घंटीच्या नादावर ताला-सुरात गायली गणरायाची आरती (photo – only_kokankar instagram)

लाडक्या बाप्पाच्या आरतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने आरती म्हटली जाते. विशेषत: कोकणातील अनेक भागांत गणरायाची आरती म्हणण्याची वेगवेगळी पद्धत आहे. कुठे टाळ-मृदुंगाच्या तालावर, तर कुठे बाजा पोटीच्या सुरात सूर मिसळत आरती म्हटली जाते. कोकणात गणरायाची आरती म्हणजे एक आनंदाचा क्षण असतो. कारण कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र येत टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तीमय वातावरणात ही आरती म्हणतात. यामुळे गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतरही गणरायाच्या आरतीच्या आठवणी ताज्या असतात. यात विसर्जनानंतरही काहीजणांच्या तोंडून आरतीच्या ओळी ऐकायला मिळतात. यातच कोकणातील एका एसटी बसमध्ये हटके पद्धतीने आरती म्हणण्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला युजर्सही चांगलीच पसंती देत आहेत.

कोकणात गणेशोत्सवाचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. यात मुंबईतील अनेक कोकणवासीय गणपतीनिमित्त खास गावी जाऊन पाच दिवस गणरायाची पूजा-अर्चा करतात. यात प्रत्येक घराघरात सकाळ, संध्याकाळ गणरायाची आरती केली जाते. पण, कोकणातील एसटीमध्येही काही प्रवासी गणरायाची आरती गात आहेत असे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे एसटीची घंटी वाजवत हे प्रवासी सुरात बाप्पाची आरती म्हणत असल्याचे दिसतेय.

anushka sharma
गरोदरपणाच्या चर्चांवर अनुष्का शर्माने सोडलं मौन? अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टने चर्चांना उधाण
aamir khan at ashish shelar place
हातात लाडूंनी भरलेले ताट अन्… आमिर खानने घेतले भाजपा नेत्याच्या मंडळाच्या बाप्पाचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल
Semolina Barfi Recipe Ganesh Chaturthi Special Dessert
Ganesh chaturthi 2023: बाप्पाच्या प्रसादाला वाटीभर रव्याची करा मऊसूत बर्फी; सोपी रेसिपी लगेच नोट करा
jui gadkari shared new promo
“आकर्षक सजावट, मोदक अन्…”, ‘ठरलं तर मग’च्या सेटवर गणेशोत्सवाची तयारी, जुई गडकरीने शेअर केली खास झलक

या व्हिडीओमध्ये, एसटीमध्ये मागच्या सीटवर बसलेले प्रवासी ‘येई हो विठ्ठले माझे माऊली’ ही आरती अगदी ताला सुरात म्हणत असून ज्याला नेटकरी चांगलीच पसंती देत आहेत. आरती म्हणण्यासाठी या प्रवाशांनी एसटीमधील घंटीचा वापर केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत सहा लाख आठ हजार ९६० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर अनेक युजर्सनी भन्नाट कमेंट्स करत हसण्याची इमोजी शेअर केल्या आहेत. अगदी वेगळ्या पद्धतीने गायलेल्या आरतीचा व्हिडीओ आता अनेकांच्या चांगलाच पसंतीस येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ganesh chaturthi 2023 ganpati bappas ye o vitthale majhe mauli ye aarti sung in rhythm to the sound of bells in st bus video viral sjr

First published on: 27-09-2023 at 14:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×