लाडक्या बाप्पाच्या आरतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने आरती म्हटली जाते. विशेषत: कोकणातील अनेक भागांत गणरायाची आरती म्हणण्याची वेगवेगळी पद्धत आहे. कुठे टाळ-मृदुंगाच्या तालावर, तर कुठे बाजा पोटीच्या सुरात सूर मिसळत आरती म्हटली जाते. कोकणात गणरायाची आरती म्हणजे एक आनंदाचा क्षण असतो. कारण कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र येत टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तीमय वातावरणात ही आरती म्हणतात. यामुळे गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतरही गणरायाच्या आरतीच्या आठवणी ताज्या असतात. यात विसर्जनानंतरही काहीजणांच्या तोंडून आरतीच्या ओळी ऐकायला मिळतात. यातच कोकणातील एका एसटी बसमध्ये हटके पद्धतीने आरती म्हणण्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला युजर्सही चांगलीच पसंती देत आहेत.
कोकणात गणेशोत्सवाचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. यात मुंबईतील अनेक कोकणवासीय गणपतीनिमित्त खास गावी जाऊन पाच दिवस गणरायाची पूजा-अर्चा करतात. यात प्रत्येक घराघरात सकाळ, संध्याकाळ गणरायाची आरती केली जाते. पण, कोकणातील एसटीमध्येही काही प्रवासी गणरायाची आरती गात आहेत असे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे एसटीची घंटी वाजवत हे प्रवासी सुरात बाप्पाची आरती म्हणत असल्याचे दिसतेय.
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi 2023 ganpati bappas ye o vitthale majhe mauli ye aarti sung in rhythm to the sound of bells in st bus video viral sjr